Deepak Kesarkar | स्थानिक लोकांनी गळा काढू नये, निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आमच्यावर अन्याय झाला – शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे धनुष्यबाण पक्षचिन्ह (Dhanushyaban Symbol) गोठवल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेनेला (Shivsena) पुन्हा एकदा डिवचले आहे. अडीच वर्षाच्या सत्ताकाळात लोकांची कामे केली नाहीत त्याचे हे प्रायचित्त आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे पक्षचिन्ह गोठवल्याने शिवसैनिक (Shiv Sainik) आणि नेते संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर सुद्धा शिवसेनेच्या बाजूच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयामुळे आमच्यावर अन्याय झाला, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले आहे.

 

शिंदे गटाचे (Shinde Group) प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थानिक लोकांनी गळा काढू नये. मुळात हा आमच्यावर झालेला अन्याय आहे. बहुमत असूनही आमचा दावा नाकारला गेला. त्यांनी सतत फक्त आयोगाकडे तारखा मागितल्या, कागदपत्र सादर केली नाही. त्यामुळे वेळेत निर्णय होऊ शकला नाही.

 

केसरकर म्हणाले, आजही आमच्या मागणीवर ठाम आहोत. आम्ही प्रतिज्ञापत्र कधी दिली याच्या सर्व नोंदी आहेत. आज आमचे चिन्ह गोठवले गेले आहे. त्यांनी अन्य पर्याय तयारही ठेवलेत. मात्र आम्ही तसे काहीही केलेले नाही. तिथे लोकशाही संपते, एकासोबत निवडून आल्यावर दुसर्‍यासोबत जाणे यामुळे लोकशाहीची हत्या होते. आता जी ओरड सुरू आहे ती केवळ लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. बाळासाहेब लोकांच्या सहानुभूतीवर कधीच अवलंबून नव्हते. बाळासाहेबांच्या कौतुकाचा हात नेहमीच शिंदेंच्या पाठीशी होता. म्हणूनच त्यांना त्रास देणे सुरू होते.

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) पुढे म्हणाले की, आम्ही या निकालाविरोधात दाद मागणार आहोत. सध्या केवळ सर्वसामान्य शिवसैनिकाला भडकवण्याचे काम सुरू आहे. जुन्या गोष्टी जोडून तोडून दाखवल्या जात आहेत. त्यामुळे शिवसैनिकांनी त्याला भुलू नये. आता भावनिक पोस्ट टाकत आहेत, त्याऐवजी 2.5 वर्षात लोकांची भेट घेतली असतीत तर आज ही वेळ आली नसती.

 

केसरकर यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधताना म्हटले
की, आदित्य ठाकरे रोज खोक्याचे ट्विट करत आहेत. कारण त्यांना खोक्याचीच सवय आहे.
शब्द त्यांना जवळचा आहे. हे ट्विट बंद करा, आम्ही त्याला उत्तक देणार नाही.
एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) सत्तेत आल्यानंतर 700 लोकहिताचे निर्णय घेतले.
ते दिवसरात्र फिरून काम करत आहेत. अंधेरीतील पोटनिवडणूकीत (Andheri By-Election) कोण निवडणूक लढवणार याचा अद्याप निर्णय झालेला नाही.
तो निर्णय शिंदे आणि फडणवीस एकत्र बसून घेतील. मुरजी पटेलांचे नाव तुम्ही सांगत आहात, मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

 

Web Title :- Deepak Kesarkar | we were wronged by the decision of the election commission said deepak kesarkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | शिवसेनेचे ठरले! उद्धव ठाकरेंनी पक्षाचे चिन्ह आणि नावासाठी निवडणूक आयोगाला दिले हे 3 पर्याय

Eknath Khadse | ‘बाळासाहेबांची वर्षानुवर्षांची पुण्याई गोठवली, हे अत्यंत…’, एकनाथ खडसे यांची भावनिक प्रतिक्रिया

Anil Desai | धनुष्यबाण गोठवल्यानंतर अनिल देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलनीय, बोलण्याची संधी…’