Uddhav Thackeray | शिवसेनेचे ठरले! उद्धव ठाकरेंनी पक्षाचे चिन्ह आणि नावासाठी निवडणूक आयोगाला दिले हे 3 पर्याय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray | शिवसेनेचे धनुष्यबाण पक्षचिन्ह (Dhanushyaban Symbol) गोठवल्यानंतर आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) हे नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही, असे म्हटले होते. दोन्ही गटांना त्यांच्या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत पर्याय देण्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या गटासाठी पक्षचिन्हाचे तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे दिले आहेत, अशी माहिती शिवसेना खासदार अरविंत सावंत (Shivsena MP Arvint Sawant) यांनी दिली आहे.

 

पत्रकारांशी बोलताना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पक्षचिन्हासाठी त्रिशूल, मशाल आणि उगवता सूर्य हे तीन पर्याय दिले आहेत. तसच पक्षाच्या नावासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे (Shivsena Balasaheb Thackeray) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) ही दोन नावे दिली आहेत.

 

दरम्यान, शिवसेनेचे पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
विविध राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास निर्णय जाहीर केला.
शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांची आज, रविवारी दुपारी ’मातोश्री’वर बैठक झाली. तर, शिंदे गटाचीही बैठक थोड्याच वेळात होणार आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray gave 3 options to election commission for party symbol and name

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Khadse | ‘बाळासाहेबांची वर्षानुवर्षांची पुण्याई गोठवली, हे अत्यंत…’, एकनाथ खडसे यांची भावनिक प्रतिक्रिया

Pune Crime | ‘जमतारा पॅटर्न’ ऑनलाईन फसवणूक प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर

Anil Desai | धनुष्यबाण गोठवल्यानंतर अनिल देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलनीय, बोलण्याची संधी…’