Deepak Mankar | साहेबांबद्दल कायमच आदर ! जनतेसाठी आहोरात्र कष्ट घेणारे अजित पवार लोकनेते आहेत, शरद पवार यांनी त्यांना आशिर्वाद देउन पाठीशी राहावे – दीपक मानकर

अ‍ॅड. रुपाली पाटील यांच्याकडे शहर महिला आघाडीचे अध्यक्षपदही सोपविले जाण्याची शक्यता तर युवक अध्यक्षपदासाठी समीर चांदेरे यांच्या नावाची चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Deepak Mankar | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाकडून संघटनेच्या विविध पदांवर नियुक्त्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गतच माजी उपमहापौर दीपक मानकर (Deepak Mankar) यांची आज शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या शासकिय निवासस्थानी अजित पवार आणि प्रदेशअध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्या हस्ते मानकर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी दीपक मानकर म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल कायमच आदर आहे. जनतेसाठी आहोरात्र कष्ट घेणारे अजित पवार लोकनेते आहेत. शरद पवार साहेबांनी त्यांना आशिर्वाद देउन पाठीशी राहावे, अशी माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा आहे.

 

दिपक मानकर (Deepak Mankar) यांनी महापालिका शिक्षण मंडळ अध्यक्षपदासह चारवेळा महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी उपमहापौरपदही भूषविले आहे. शिक्षण मंडळ अध्यक्ष असताना मानकर यांनी महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सामाजिक कार्यातही ते अग्रेसर असतात.

 

अध्यक्षपदावरील निवडीनंतर मानकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले अजित पवार राज्याच्या विकासासाठी झपाटून काम करणारे नेतृत्व आहे. त्यांच्या या कार्यात योगदान देण्यास मी कटीबद्ध आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी तसेच शहराचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. पक्ष संघटना मजबूत करून राष्ट्रवादीवरील विश्‍वास वाढविण्यासाठी अजित पवारांनी दिलेली जबाबदारी तितक्याच ताकदीनिशी पार पाडीन.

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)
यांची महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षपदी तर अ‍ॅड. रुपाली ठोंबरे- पाटील (Adv Rupali Thombare Patil)
यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अ‍ॅड. रुपाली पाटील यांच्याकडे
शहर महिला आघाडीचे अध्यक्षपदही सोपविले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
तर युवक अध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक बाबूराव चांदेरे (Baburao Chandere) यांचे चिरंजीव समीर चांदेरे (Sameer Baburao Chandere) यांच्या नावाची चर्चा आहे.

 

Web Title : Deepak Mankar | Ajit Pawar is a people’s leader who works day and night for the people,
Sharad Pawar should bless him and support him

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Pune Police News | मुंढवा पोलिसांच्या सतर्कतेमुळे चिमुरडी परतली आईच्या कुशीत

Kajol And Madhuri Dixit | काजोलला माधुरी दीक्षित वाटते बॉलीवुडमधील सर्वात जास्त…

Maharashtra Political Crisis | शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता भाजपमध्ये होणार मोठा भूकंप, पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर?