‘छपाक’ मधील दीपिकाचा आणखी एक लूक व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल यांच्य जीवनावर छपाक हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शुटींगलाही सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा फर्स्ट लुक समोर आला होता. अभिनेत्री दीपिका पादुकोण ही लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. आता याच सिनेमाच्या सेटवरील दीपिकाचा आणखी एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लक्ष्मीच्या लुकमधील दीपिकाचा हा दुसरा व्हायरल होणारा फोटो असून तिचा हा दुसरा फोटो थक्क करणारा असल्याचं जाणवतं.

दीपिकाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर दीपिकाच्या या लुकची लक्ष्मीनेही प्रशंसा केली आहे तिला दीपिकाचा हा लुक विशेष आवडला आहे. यावर प्रतिक्रिया देताना लक्ष्मी म्हणाली की, “दीपिकाचा हा लुक पाहून मला खूप आनंद झाला आहे. मी खूप खुश आहे. सेलिब्रिटी अशा लुकमध्ये समोर येताना पाहून मला चांगलं वाटत आहे.” असे लक्ष्मी म्हणाली.

अभिनेता विक्रांत मेस्सी या चित्रपटात दीपिकासोबत दिसणार आहे. विक्रांत मेस्सीने अनेक सिनेमांमध्ये सहकलाकाराची भूमिका साकारली आहे. छपाकच्या माध्यमातून तो प्रथमच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याला थेट दीपिकासोबत काम करण्याची संधी मिळत आहे. या चित्रपटात, अॅसिड हल्ला होऊनही लक्ष्ममीचा जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोन दाखवण्यात येणार आहे. मालती असं या दीपिकाच्या भूमिकेचं नाव आहे.

या सिनेमात दीपिका म्हणजेच मालतीला करावा लागणारा संघर्ष आणि तिच्यावर आेढावणाऱ्या संकटांवर मात करून ती अखेर सुखी आयुष्य जगते हा प्रवास दाखवण्यात येणार आहे. मेघना गुलजार यांचा हा आगळी वेगळी कथा असणारा छपाक हा सिनेमा 10 जानेवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.