दीपिका पादुकोणने प्रेग्नेंसीबाबत केला मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या वर्षीच अभिनेता रणवीर सिंगसोबत विवाहबद्ध झाली. यानंतर गेल्या काही दिवसांपासून दीपिका प्रेगनंट असल्याची चर्चा सुरु असल्याचं दिसून आलं. परंतु याबाबत दीपिकाने खुलासा केला आहे. तिचे प्रेगनंट असल्याचे वृत्त खोटे असल्याचे दीपिकाने स्पष्ट केले आहे. एका मुलाखतीत बोलताना तिने हा खुलासा केला आहे.

 

एका मुलाखतीत बोलताना दीपिका म्हणाली की, “मी कधीना कधी आई बनणारच आहे. मात्र महिला किंवा जोडप्यांवर पालक बनण्यासाठी दबाव टाकला नाही पाहिजे. ज्या दिवशी महिलांना आई बनण्याबाबत विचारणे बंद होईल त्यावेळीच वास्तविकमध्ये समाजात बदल होऊ शकेल.” असे मत दीपिकाने मांडले.

View this post on Instagram

❤️

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 

सध्या दीपिका छपाक या तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटींग मध्ये व्यस्त आहे. मध्यंतरी तिचा शुटींगजदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात ती रस्त्यावर उभी होती एकटीच. परंतु तिच्या भूमिकेच्या मेकअपमुळे कोणी तिला ओळखलेच नाही. अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. त्यात दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारत आहे.

 

मुलाखतीत बोलताना दीपिकाने तिच्या लक्ष्मीच्या पहिल्या भेटीविषयीदेखील खुलासा केला आहे. तिची आणि लक्ष्मीची पहिली भेट ही एक वर्षापूर्वी दिल्लीत एका कार्यक्रमात झाली होती. दिल्लीतील पुरस्कार सोहळ्यात दीपिका आणि लक्ष्मी या दोघींनाही आपल्या कार्यसाठी गौरवण्यात आले होते. त्यावेळी दीपिका पहिल्यांदाच लक्ष्मीला भेटली होती असे दीपिकाने मुलाखतीत सांगितले. दरम्यान 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

View this post on Instagram

Muscle. #chhapaak

A post shared by Meghna Gulzar (@meghnagulzar) on

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like