दीपिकाने सांगितले रणवीरच्या हाय एनर्जीचे सिक्रेट…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला अभिनेता रणवीर सिंग याचा ‘गलीबॉय’ हा सिनेमा चांगलाच गाजतो आहे. ‘गलीबॉय’चा प्रेक्षकांवर विशेषत: तरुणांवर मोठा प्रभाव दिसून येत आहे. तरुणांना याची इतरी भुरळ पडली आहे की, आता खेडोपाडी, गल्लोगल्ली नवे ‘गलीबॉय’ (रॅपर) तयार होताना दिसत आहेत. रणवीरने केलेली गलीबॉयची भूमिका चांगलीच गाजते आहे. रणवीर एखादी भूमिका करताना त्यात पूर्णपणे बुडून जातो. स्क्रीन असो किंवा रिअल लाईफ तो नेहमीच एनर्जेटीक दिसतो. काही दिवसांपूर्वीच त्याची पत्नी दीपिका पादुकोणने त्याच्या या हाय एनर्जीचे सिक्रेट सांगितले आहे.

दीपिका पादुकोण म्हणाली की, “रणवीर सिंग घरी आणि कामावर असताना खूपच वेगळा असतो.” असे सांगत दीपिकाने त्याच्या एनर्जीचे सिक्रेट सांगत ती त्याला सकाळी नाश्त्यामध्ये काय खायला देते हेदेखील सांगितले आहे. दीपिका म्हणाली की, “सकाळी बाहेर पडताना मी रणवीरला नाश्ता करूनच पाठवते. नाश्त्यात मी त्याला बदाम आणि नारळ पाणी देते.” यावरून स्पष्ट होते की, रणवीरच्या हाय एनर्जीचे सिक्रेट त्याचा नाश्ता आहे.

पुढे बोलताना दीपिका म्हणाली की, “कामाच्या दरम्यान रणवीर सिंग खूपच गंभीर आणि शांत असतो. परंतु त्याचा एक पोरकटपणाही आहे. त्याची एक भावनात्मक बाजूही मी पाहिली आहे.” असेही दीपिका म्हणाली.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या रणवीर सिंग त्याचा आगामी सिनेमा 83 च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे दीपिका पादुकोणदेखील तिचा आगामी सिनेमा छपाकच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.