फॅमिली ग्रुपमध्ये कसा वागतो रणवीर, दीपिकाने शेअर केला ‘स्क्रीनशॉट’

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत येतात. कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये रणवीर आणि दीपिकाची मस्ती सोशल मीडियावर दिसून येत आहे. लॉकडाऊनमध्ये दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असून दीपिकाने तिच्या फॅमिली ग्रुपचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये तिने फॅमिली ग्रुपवर रणवीर कसा वागतो हे सांगितले आहे.

दीपिकाने शेअर केलेला फॅमिली ग्रुपचा स्क्रीनशॉट खूप व्हायरल झाला आहे. हा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर करत दीपिकाने लिहिले आहे, पाहा कुटुंब असे चालते. यामध्ये दीपिकाची आई रणवीरचे त्याच्या मुलाखतीसाठी कौतुक करताना दिसत आहे. यासोबतच रणवीरच्या वडीलांनीही त्याचे कौतुक केले आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट या फोटोमधून समोर आली ती म्हणजे, दीपिकाने तिच्या फोनमध्ये रणवीरचे नाव हॅन्डसम म्हणून सेव्ह केले आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाची साफसफाई करताना पाठ दुखू लागली होती. तेव्हा रणवीरने तिला आराम करायला सांगितले होते. मात्र काही वेळानंतर जेव्हा तो व्यायाम करून घरी आला तेव्हा दीपिका पुन्हा काम करत होती. दीपिकाच्या या सतत काहीतरी करण्याच्या सवयीला कंटाळून रणवीरने तिची फॅमिली ग्रुपमध्ये तक्रार केली होती. दीपिकाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे तर ती सध्या तिच्या इंटर्न सिनेमाच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. याशिवाय ती रणवीर सोबत ’83’ सिनेमात दिसणार आहे. लग्नानंतर या दोघांचा हा एकत्र पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात ती कपिल देव यांच्या पत्नीची म्हणजेच रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे.