दीपिकाचा छपाकच्या सेटवरील आणखी एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री दीपिका पादुकोण तिचा आगामी सिनेमा छपाकमुळे चांगलीच चर्चेत असल्याचं दिसत आहे. सध्या दीपिका दिल्लीत छपाकच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. लक्ष्मी अग्रवालच्या अ‍ॅसिड अ‍ॅटॅकवर या सिनेमाची कथा आहे. यात दापिकाने मालतीचा (लक्ष्मीचा) रोल केला आहे. या सिनेमात तिच्यासोबत विक्रांत मेसीही झळकणार आहे.

https://www.instagram.com/p/BwXjxzOD8Z4/?utm_source=ig_embed

काही दिवसांपूर्वी दीपिकाचा शुटींगदरम्यान एक व्हिडओ समोर आला होता. त्यानंतर आता शुटींगच्या सेटवरून आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओत दिसतं की, दीपिका रिक्षातून उतरते. दुसऱ्या रिक्षातून विक्रांत मेसी उतरताना दिसतो. विक्रांत बॅग घेतो आणि मग ते दोघे पुढे निघून जातात. या व्हिडीओत दीपिका आणि विक्रांत सोबत आणखी 3 लोक दिसत आहेत. दीपिकाने लाल रंगाचा सुट घातल्याचे दिसत आहे.

छपाकचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ दुसरा व्हिडीओ आहे. याआधीच्या व्हिडीओत दीपिका आणि विक्रांत बाईकवर आल्याचे दिसत आहे. काही क्षणातच विक्रांत गाडी थांबवतो आणि पुन्हा कुठेतरी निघून जातो. पुढील वर्षात 10 जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मेघना गुलजार या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.

https://www.instagram.com/p/Buy0gDqgKMs/?utm_source=ig_embed