Manish Sisodia : ‘केंद्र सरकार जेवढं डोकं विरोधी पक्षांच्या राज्यांविरोधात वापरतंय त्याच्या 1 % जरी कोरोनाविरुध्दच्या लढाईत वापरले असतं,तर…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अवघा देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे राजधानी दिल्लीतही परिस्थिती गंभीर बनली आहे. यावरून दिल्ली(Delhi) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी पुन्हा एकदा दिल्लीचे(Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधांचा हवाला देत-देत केजरीवाल सरकारने दिल्लीला(Delhi) कोरोनाचा मृत्यूदर प्रती 10 लाखांच्या यादीत आघाडीवर आणून ठेवला आहे. याशिवाय केजरीवाल यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्याच्या आकडेवारीत हेराफेरी केल्याचा आरोपही गुप्ता यांनी केला आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी केंद्र सरकारला सणसणीत टोला लगावला आहे.

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी आपल्या ट्विटरवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकार जेवढ डोकं विरोधी पक्षाची सत्ता असणाऱ्या राज्य सरकारांशी लढण्यासाठी वापरत आहे. त्याच्या एक टक्का जरी कोरोनाविरुद्धच्या लढाईत किंवा लसीकरणाची व्यवस्था बसवण्यासाठी वापरल असते तर आज देशात हाहाकार उडाला नसता. एवढ्या जणांचा मृत्यू झाला नसता. पण ते म्हणतात ना ज्याच्या मानसिकतेमध्ये जे असतं तेच तो करतो तसा प्रकार असल्याचे म्हणत सिसोदीया यांनी निशाणा साधला आहे. दरम्यान केजरीवाल फेरफार करण्यामध्ये पारंगत आहेत, त्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही केजरीवाल यांनी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची खरी आकडेवारी लपवल्याचा आरोप गुप्ता यांनी केला आहे. एवढंच नाही तर दिल्लीमधील परिस्थिती चिंताजनक असताना केजरीवाल यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. आरोग्य व्यवस्थेच्या कमतरतेमुळे दिल्लीत रुग्णांचा मृत्यू होत असतानाच दुसरीकडे केजरीवाल या परिस्थितीची जबाबदारी इतर कोणावर तरी ढकलण्याचा प्रयत्न करत होते. अन्य राज्यांच्या तुलनेत प्रती 10 लाख व्यक्तींच्या हिशोबाने दिल्लीमध्ये सर्वाधिक मृत्यू झालेत, असे आदेश गुप्ता म्हणाले.

 

Gold-Silver Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड तेजी, Gold 50000 रूपयांच्या जवळ तर Silver 72 हजारांवर

Health in Your Hands : Corona सह गंभीर आजारांचा संकेत देतात तुमचे हात, असा घ्या शोध

Pune : पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कर्मचारी आणि त्याच्या भावाकडून Covid केअर सेंटरमधील डॉक्टरला चौकीत घुसून मारहाण, प्रचंड खळबळ

Coronavirus Vaccination : कोविड-19 व्हॅक्सीनच्या साईड-इफेक्ट्सपासून आराम देऊ शकते का नारळपाणी?, जाणून घ्या

नारायण राणेंची मराठा समाजासाठी मागणी, म्हणाले – ‘3 हजार कोटींचे पॅकेज द्या’

केमिकल टँकर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण आग लागून दोघांचा होरपळून मृत्यू