दिल्ली विधानसभा : ‘आप’नं कापलं 15 आमदारांचं तिकीट, केजरीवाल नवी दिल्लीतून लढणार, 70 उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकलं गेलं आहे. पक्षांकडून आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहे. आम आदमी पक्षानेही मतदारांच्या पसंतीच्या सर्व उमेदवारांची यादी पहिल्याच फटक्यात जाहीर केली आहे. समोर आलेल्या यादीनुसार, आपने विद्यमान 46 आमदारांना तिकीट दिलं आहे तर 15 आमदारांचं तिकीट कापल आहे.

गेल्या वेळेस आपने 6 महिलांना उमेदवारी दिली होती. या यादीमध्ये मात्र 8 महिलांन संधी देण्यात आली आहे. या यादीत 9 रिक्त जागांवर नवीन उमेदवार देण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे विद्यमान आमदारांपैकी 46 आमदारांची वर्णी लागली आहे. तर 15 विद्यामान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अरविंद केजरीवाल हे नवी दिल्लीमधून निवडणूक लढवणार आहेत. तर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया हे पतपरगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

दिल्लीतील निवडणुकीत काय होईल याबाबत जनतेचा संभाव्य कल सांगणारे अनेक ओपिनियन पोल समोर आले आहेत. अनेकांनी आपची सत्ता कायम राहणार असल्याचं म्हटलं आहे. आम आदमी पक्ष पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने वियजी होणार आहे. भाजप आणि काँग्रेसला तर दोन आकडी जागाही जिंकता येणार नाहीत असा अंदाज ओपिनियन पोलचा आहे.

फेसबुक पेज लाईक करा –