दिल्लीत उद्धव-मोदींमध्ये खलबतं, राज्यात भाजपने बोलवली तातडीची बैठक, फडणवीस यांच्या बंगल्यावर हालचालींना वेग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी आज दिल्लीला (Delhi) रवाना झाले आहे. मागील एक तासापासून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यामध्ये खलबतं सुरु आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) उपस्थित आहेत. दिल्लीत पंतप्रधानांसोबत खलबतं सुरु असताना दुसरीकडे महाराष्ट्रात (Maharashtra) राजकीय हालचालींना वेग आला आहे.

फडणवीसांच्या बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ‘सागर’ या बंगल्यात भाजपच्या (BJP) प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीचे नेमकं कारण समजू शकले नाही. परंतु दिल्लीतील (Delhi) ठाकरे-मोदी भेटीच्याच पार्श्वभूमीवर ही चर्चा करण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही सर्वसाधारण बैठक – दरेकर

फडणवीस यांच्या बंगल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. फडणवीस यांनी बोलवलेली ही बैठक पक्षांतर्गत सर्वसाधारण बैठक आहे. या बैठकीचा आणि मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या बाठकीचा काहीही संबंध नाही, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रामध्ये समन्वयानं चर्चा होत असेल तर याचं आम्हाला चंगलंच वाटेल, चिंता करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही दरेकर यांनी म्हटले.

दिल्लीत एक तासापासून खलबंतं सुरु

दिल्लीत (Delhi) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्या तासभरापासून बैठक सुरु आहे. या बैठकीमध्ये मराठा आरक्षण, जीएसटी (GST) थकबाकी आणि तौक्ते वादळाच्या नुकसान भरपाई संदर्भात चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर निवेदनाद्वारे जीएसटी थकबाकी राज्याला तातडीने देण्याची मागणी केली, असेही सांगण्यात येत आहे.

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

खासदार नवनीत राणांना मोठा झटका, मुंबई HC कडून जात प्रमाणपत्र रद्द, खासदारकी धोक्यात

फायद्याची गोष्ट ! एकाच दिवसात बनाल ‘लखपती’, 14 ते 16 जूनपर्यंत बंपर कमाईची ‘सुवर्णसंधी’, जाणून घ्या

Nashik Crime News : धक्कादायक ! सावत्र आईकडून अल्पवयीन मुलाचा छळ, रागाच्या भरात गुप्तांगाला दिले चटके