राजधानी दिल्लीत ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावात दिलासादायक बातमी, 24 तासांत ‘विक्रमी’ 7700 रुग्ण झाले बरे

ADV

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : शनिवारी दिल्लीत कोरोना संसर्गाने अनेक विक्रम मोडले. कोरोना चाचणी वाढत गेल्याने सकारात्मक घटनांची संख्या सातत्याने वाढत आहे. शनिवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या विक्रमी 3630 जणांची नोंद झाली. यासह दिल्लीत कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या वाढून 23,340 झाली आहे. या दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे एक दिवसात ठीक होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही रेकॉर्ड नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात आलेल्या कोरोना रूग्णापेक्षा दुप्पट रुग्ण उपचारानंतर बरे झाले. दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, राजधानीत उपचारानंतर एका दिवसात 7725 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

77 लोकांचा मृत्यू
दिल्लीत एकूण कोरोनाची प्रकरणे वाढून 56,746 वर गेली आहेत. राजधानीत गेल्या 24 तासात कोरोनामुळे 77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह दिल्लीत एकूण मृतांची संख्या 2112 वर गेली आहे. गेल्या 24 तासात 7725 रुग्ण बरे होऊन घेरी गेल्यांनतर दिल्लीत आतापर्यंत 31,294 लोक बरे झाले आहेत.

दिल्लीत वाढवली जातेय चाचण्यांची संख्या
गेल्या 24 तासांत, दिल्ली आरोग्य विभागाने राजधानीतील 17533 लोकांच्या कोरोना चाचण्या केल्या. कोणत्याही एका दिवशी घेतल्या जाणार्‍या नमुन्या चाचण्यांचा हा सर्वाधिक आकडा आहे. दिल्लीत आतापर्यंत एकूण 3,51,909 लोकांची चाचणी घेण्यात आली आहे. तर होम क्वारंटाईन कोरोना रूग्णांची संख्या वाढून 12611 झाली आहे.