Coronavirus : दिल्लीत ‘कोरोना’नं आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले, 24 तासात 1295 नवे पॉझिटिव्ह रूग्ण, आरोग्य विभागात खळबळ

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  देशाची राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूचा कहर वाढत चालला आहे. दिल्लीमध्ये कोरोना संक्रमणाची प्रकरणे 19 हजार 844 पर्यंत पोहचली आहे. गेल्या 24 तासात दिल्लीमध्ये 1295 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 24 तासात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येण्याची ही आत्तापर्यंतची पहिलीच वेळ आहे.

एकीकडे दिल्लीत रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे या आजारातून बऱे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. गेल्या 24 तासात विक्रमी 416 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर काही रुग्णांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

दिल्लीत बरे झालेले, डिस्चार्ज केलेले किंवा स्थलांतरित केलेल्या रुग्णांची संख्या 8478 इतकी आहे. मात्र मृत्यूची संख्या वाढत असून रुग्णांच्या मृत्यूच्या संखेत घट होताना पहायला मिळत नाही. गेल्या 24 तासात दिल्लीमध्ये कोरोनामुळे मृत्यू 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दल्लीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 473 वर पोहचली आहे. दिल्लीमध्ये सध्या 10893 अॅक्टिव्ह आहेत. दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून 28 मेला 1024, 29 मे 1106 आणि 30 मे ला 1106 रुग्ण आढळून आले होते. तर 31 मे रोजी ही संख्या वाढली असून आज 1295 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.