दिल्ली ‘अनाज’ मंडईत भीषण आग ! आत्तापर्यंत 43 जणांचा मृत्यू, PM नरेंद्र मोदी आणि CM केजरीवालांनी दुखः व्यक्त केलं

दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील भाजी मंडई परिसरात रविवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा गुदमरून आणि होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी 56 हून अधिक जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.

राणी झाशी रोडवरील ‘अनाज’ मंडई भागातील घरांना रविवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीची घटना समजताच अग्निशामक दलाच्या 40 गाड्या घटनास्थळी पोहचून त्यांनी घरात अडकलेल्या सुमारे 56 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

अरुंद गल्ल्या आणि सकाळीच लागलेल्या आगीत अनेक जण झोपेत होते. त्यामुळे आग व धुरामुळे त्यांना घरातून बाहेर पडता आले नाही. अनेकांचा भाजून तसेच गुदमरुन मृत्यू झाला. आगीतून बाहेर काढलेल्या लोकांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या आगीत 43 जणांचा मृत्यू झाला असून ही संख्या वाढू शकत असल्याचे येत आहे. आता या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असल्याचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी सुनिल चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शोक व्यक्त केला आहे.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like