गुंजन सक्सेना चित्रपटावर बंदी घालण्यास न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   दिल्ली उच्च न्यायालयाने नेटफ्लिक्सवरील ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यावर नकार दिला आहे. केंद्राने आपल्या याचिकेवर सांगितले आहे की, हा चित्रपट भारतीय वायु दलाची प्रतिमा प्रेक्षकांसमोर मांडत आहे. न्यायाधिश राजीव शकधर यांनी केंद्राला विचारले की, ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शिक करण्यापूर्वी न्यायालयाकडे आक्षेप का नोंदविले नाहीत, त्यामुळे आता कोणताही आदेश देता येणार नाही. कारण, चित्रपट प्रदर्शित झालेला आहे.

केंद्राकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी सांगितले की, चित्रपट भारतीय वायु दलाची प्रतिमा डागाळत आहे. कारण, यामध्ये दाखविले आहे की, वायु दलामध्ये लैंगिक भेदभाव केला जात आहे. हे प्रेक्षकांना दाखविणे, योग्य नाही. उच्च न्यायालयाने चित्रपटाचे प्रदर्शनावर बंदी घालण्याचा आग्रह करणाऱ्या केंद्राच्या याचिकेवर ‘धर्मा प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड’ आणि नेटफ्लिक्सला उत्तर मागितले आहे. न्यायालयाने असेही सांगितले आहे की, फ्लाइट लेफ्टिनेंट गुंजन सक्सेना यांच्या संदर्भातदेखील एक बाजू मांडायला हवी आणि त्यांसाठी त्यांना नोटीस देऊन त्यांचीही बाजू न्यायालयाने मागितली आहे. १२ आगस्टला ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.