नवऱ्याच्या मृत्यूनंतर दिरासोबत राहत होती वहिनी, गळा आवळून केली हत्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजधानी दिल्लीत एका दिराने आपल्या वाहिनीची गळा दाबून हत्या केली. गेल्या तीन वर्षांपासून आरोपी दीर आपल्या वाहिनीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. घरातील भांडणाला कंटाळून आरोपीच्या भावाने तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. खुनाची ही खळबळजनक घटना दिल्लीतील करावल नगर भागातली आहे. आरोपी दीर रोहितने वाहिनीची हत्या केल्यानंतर डीसीपी कार्यालयात जाऊन आत्मसमर्पण केले. पोलिसांनी आरोपी रोहितला अटक केली आहे. आता पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, रोहित ईशान्य दिल्लीतील ठाणे करावल नगरांतर्गत जोहरी जगदंबा कॉलनीत आपल्या वहिनीसोबत राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहितने सांगितले की घरातील भांडणामुळे त्याच्या भावाने तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. तेव्हापासून त्याची वाहिनी त्याच्यासोबत राहत होती. आता त्यांच्यातही भांडण सुरू झाले होते. रोहितच्या म्हणण्यानुसार, त्या महिलेने पुन्हा भांडणं सुरू केली होती. या भांडणामुळे कंटाळलेल्या रोहितने तिची गळा दाबून हत्या केली.

ही घटना घडल्यानंतर रोहितने स्वत: पोलिस कार्यालय गाठले व आत्मसमर्पण केले. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रोहितला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून त्याला तुरूंगात पाठविण्यात आले