Pulsar चालवत पुरुषाच्या वेषात करायची लूटमार, वाचा लेडी डॉन ‘राणी’च्या गुन्ह्यांची पूर्ण कथा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  रस्त्याने चाललेल्या महिला किंवा पुरुषांना टार्गेट करणे आणि पापणी लवण्याच्या आत त्यांच्या हातातून महागडी वस्तू घेऊन पळून जाणे या महिलेसाठी सामान्य बाब होती. रस्त्यावर काही क्षणात पल्सर पळवत गुन्हा करणे या महिलेसाठी डाव्या हाताचा खेळ मानला जात होता. तिचे नाव आहे लेडी डॉन रमाप्रीत. अटकेपूर्वी रमाप्रीत नावाची ही महिला पोलिसांसाठी सुद्धा एक रहस्यमय बाईकस्वार महिला गुन्हेगार होती, जी मोबाईल आणि महिलांच्या चैन खेचून फरार होत असे.

दिल्लीच्या नांगलोई परिसरात राहणार्‍या रमाप्रीतने पतीच्या हत्येत अटक झाल्यानंतर गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले. 2014 पासून गुन्हे सुरू करून रमाप्रीतने काही दिवसात पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. अटक झाल्यानंतर ती जमीनावर सुटताच पुन्हा सोनसाखळी खेचण्याचे गुन्हे करत होती. असे म्हटले जाते की तिने कमीत कमी 100 अशाप्रकारचे गुन्हे केले आहेत. पोलिसांनी 30 पेक्षा जास्त सीसीटीव्ही शोधल्यानंतर तिला पकडण्यात यश आले. तिला दोन वर्षासाठी तडीपार सुद्धा करण्यात आले आहे.

या लेडी डॉनला जेव्हा पोलिसांनी पकडले होते तेव्हा तिच्याकडे सोन्याच्या 7 चैन, सोन्याच्या अंगठ्या, आयफोन आणि 78,000 रुपये कॅश आणि चांदी सापडली होती. या लेडी डॉनची गुन्हा करण्याची पद्धत अशी होती की, ती पल्सर एएस 200 मोटरसायल चालवत असे आणि पुरुषांप्रमाणे कपडे परिधान करत असे. जेणेकरून तिला कुणी ओळखू नये. 2019 मध्ये मार्च महिन्यात दोन गुन्हेगारांनी एका महिलेला लुटल्यानंतर बाईकसोबत तिला खुप दूरपर्यंत ओढत नेले होते. पोलिसांनी सांगितले होते की, या गुन्ह्यात सुद्धा रमाप्रीत सहभागी होती. या घटनेचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर खुप वायरल झाला होता.

अटक झाल्यानंतर या महिलेने पोलिसांसमोर कबुल केले होते की, तिला 2014 मध्ये पतीच्या मर्डर केसमध्ये अटक झाली होती. यानंतर ती गुन्हेगारी जगतात आली. पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर समजले की, रमाप्रीत कौर उर्फ रिंकल सोबत तिचा मित्र रमनीक सिंह उर्फ विनय सुद्धा या गुन्ह्यांमध्ये सहभागी होत असे.

रमाप्रीत कौरला दिल्लीत गुन्हेगारी जगताची राणी म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर, रमनीक निलोठी एक्सटेंशन चंद्रविहारचा राहणारा आहे. रमाप्रीत कौर दिल्लीच्या निहाल विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोषित गुन्हेगार आहे. ती दोन वर्ष तडीपार सुद्धा होती. या महिलेने नागलोई परिसरात एक घर सुद्धा खरेदी केले होते.