BJP चा मेहबुबा मुफ्ती यांना ‘दणका’, अनेक नेत्यांची भाजपमध्ये ‘एन्ट्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेससह मोठ्या पक्षांना झटका दिल्यानंतर आता भाजपने काश्मीरमधील मेहबूबा मुफ्ती यांना झटका दिला आहे. त्यांच्या पीडीपीमधील अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काल सोमवारी पीडीपीचे नेते हाजी अनायत अली यांनी भाजप सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गजेंद्र सिंह शेखावत उपस्थित होते.

लडाखमध्ये अनेक नेत्यांचा पक्षाला रामराम

नुकत्याच केंद्र सरकारच्या घोषणेनंतर केंद्र शासित प्रदेश बनलेल्या लडाखमध्ये देखील पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी पक्षाला सोडचिट्टी देत स्थानिक भाजप खासदार जम्यांग नामग्याल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये जम्मू काश्मीर विधानपरिषदेचे अध्यक्ष हाजी अनायत अली यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना म्हटले कि, पुढील दोन वर्षांत तुम्ही अनेक बदल अनुभवाल.

आता जे भाजपला विरोध दर्शवत आहेत ते भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसून त्यांना भाजपमध्येच यावे लागेल. हाजी अनायत अली यांच्याबरोबरच यावेळी मोहम्मद अली चंदन तसेच कारगिल नगरपालिका समितीचे प्रमुख जहीर हुसैन बाबर यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर कारगिलमधील काचो गुलजार हुसैन, असदुल्लाह मुंशी, इब्राहिम आणि ताशी त्सेरिंग यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरसह पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला असून पाकिस्तान या मुद्द्यावरून भारताला अंतरराष्ट्रीत न्यायालयात खेचण्याच्या तयारीत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –