दिल्लीच्या रोहिणीमध्ये ‘डबल’ मर्डर ! शिक्षकाने पत्नी आणि सुनेला ‘संपवलं’, अनैतिक संबंधाचा ‘संशय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या रोहिणी भागातून शुक्रवारी सकाळी एक अशी घटना समोर आली जी अत्यंत लाजिरवाणी होती. दिल्लीच्या रोहिणीमधील सेक्टर 4 मध्ये आज एक व्यक्तीने आपल्या पत्नी आणि सुनेची हत्या केली. घरगुती वादामुळे 62 वर्षीय सतीश चौधरी यांनी आल्या पत्नीची स्नेहलता आणि सून प्रज्ञा चौधरी यांची चाकूने वार करुन हत्या केली. यात आपल्या आई आणि वहिणीला वाचवण्याचा प्रयत्नात मुलगा सौरभ जखमी झाला आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती सकाळी 5.55 वाजता मिळाली, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आता घटनास्थळाचा तपास सुरु आहे.

या घटनेमागे अवैध संबंध वादाचे कारण असल्याचे बोलले जात आहे. परंतू पोलिसांनी या घटनेवर बोलण्यास नकार दिला आहे. असे सांगितले जात आहे की आरोपी सतीश चौधरी डीटीसी मधून निवृत्त झाले आहेत आणि सध्या एका खासगी ठिकाणी शिक्षक म्हणून काम करत आहे.

आरोपीची दोन्ही मुलं सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. मोठा मुलगा गौरव सिंगापूरमध्ये कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे तर लहान मुलगा बंगळुरुला एक कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. घटनेवेळी घरात आरोपी, त्याची पत्नी त्यानी सून आणि लहान मुलगा होता. विजय विहार पोलीस ठाण्यात या प्रकरणी आयपीसी कलम 351/19 u/a 302/324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com