Delhi Violence : ‘स्वरा भास्करला तात्काळ अटक करा’, ‘तो’ व्हिडीओ पाहून भडकले लोक

पोलीसनामा ऑनलाइन – दिल्ली हिंसाचार सध्या मंदावला आहे. या हिंसेत अनेकांचा बळी गेला आहे. रिपोर्टनुसार अद्याप 34 लोकांनी आपला जीव गमावला आहे तर 150 हून अधिक लोक जखमी झााले आहेत. बुधवारी अनेक स्टार्सनी सोशल मीडियावरून ट्विट करत आपल्या भावना मांडल्या आहेत. कोणी शांतीचं अपील करताना दिसत आहे तर कोणी सरकारला कठोर पाऊल उचलण्यास सांगत आहे.

अशात काही सोशल मीडिया युजर्नसी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. ज्यात स्वरा भास्कर दिल्लीत हिंसाचार भडकवण्याचं काम करत आहे. तिनं सरळ सरळ भारतीय सुप्रीम कोर्टाला चुकीचं म्हटलं आहे.

यानंतर आता स्वरा भास्करच्या विरोधात अनेक ट्विट केले जाताना दिसत आहेत ज्यात तिला अरेस्ट करण्याची मागणी केली जात आहे. सध्या ट्विटरवर #ArrestSwaraBhaskar हा हॅशटॅगही ट्रेंड करताना दिसत आहे. अनेकांनी स्वराविषयी राग व्यक्त केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळे ट्विट केले आहेत. स्वरा भास्करला विरोध करणारे आणि तिला अरेस्ट करा अशी मागणी केली गेलेले अनेक ट्विट्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

You might also like