Delta Plus Variant | डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे तिसरी लाट येऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  डेल्टा व्हेरियंटमुळे (Delta Plus Variant) आलेल्या कोरोना दुसऱ्या लाटेमुळे देशाची बिकट अवस्था झाली होती. दिवसागणिक झपाट्याने बाधितांची संख्या वाढत होती. मात्र, त्याप्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. अनेकांना बेड ऑक्सिजन अभावी प्राण गमवावे लागले. सद्य स्थितीत ही परिस्थिती ओसरत असताना म्युकरमायकोसिसचे संकट ओढवले.

ते कमी होतेना होते तोपर्यंत डेल्टा प्लस या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. देशात या व्हेरियंटचे ४० रुग्ण असून त्यापैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण आहेत. दरम्यान, या व्हेरियंटमुळे तिसरी लाट येऊ शकते का यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहे. मात्र, डेल्टा प्लसमुळे तिसरी लाट येऊ शकते याबाबत कोणतेही पुरावे नसल्याचा खुलासा तज्ज्ञांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीने डेल्टा प्लस व्हेरियंट आणि भारतातील परिस्थिती यावर द इंस्टीट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे डॉ अनुराग यांची विशेष मुलाखत घेतली आहे.

ते म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. ती ओसरत असली तरी निष्काळजीपणा करता कामा नये. डेल्टा प्लस व्हेंरियंटमुळे तिसरी लाट येऊ शकते याबाबत कोणतेही पुरावे मिळालेले नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेची काळजी करण्यापेक्षा दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असा सल्ला त्यांनी दिला.

डॉ. अग्रवाल पुढे बोलताना म्हणाले, महाराष्ट्रात जून महिन्यात माझ्या संस्थेमार्फत साडेतीन हजार
चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये एप्रिल आणि मेमधीलही काही असून यावेळी डेल्टा प्लस
व्हेरियंटचे प्रमाण जास्त आढळल. परंतु, हे प्रमाण एक टक्केंपेक्षा कमी आहे. भारतासाठी डेल्टाचा
कोणाताही व्हेरियंट चिंतेचा विषय आहे. कोरोनाची दुसरी लाट अजून संपुष्टात आली नाही ही आपली
सर्वात मोठी चिंता आहे. त्यामुळे अजूनही सतर्क राहणे आवश्यक असून कोरोना नियम पाळावेच
लागणार असल्याचेही त्यांनी म्हंटले.

हे देखील वाचा

BJP MLA Gopichand Padalkar । गोपीचंद पडळकरांचा घणाघात; म्हणाले – ‘ओबीसी नेत्याचं माकड झालंय’

Sowing | हवामान तज्ज्ञांचा शेतकर्‍यांना महत्वाचा सल्ला; म्हणाले – ‘पुढील आठवड्यात पाऊस कमी, पेरणीची घाई करू नका’

Maharashtra Strict Restriction | डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Delta Plus Variant | top medical scientist says no proof of covid delta plus causing third wave

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update