Sowing | हवामान तज्ज्ञांचा शेतकर्‍यांना महत्वाचा सल्ला; म्हणाले – ‘पुढील आठवड्यात पाऊस कमी, पेरणीची घाई करू नका’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्यात पुढील आठवड्यात पाऊस (Monsoon rains) कमी होणार असून उष्णता वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची (Sowing) घाई करू नये, असा सल्ला वेधशाळेचे (IMD) हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी दिला आहे. होसाळीकर यांनी ट्विट करून राज्यातील हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील विविध भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे पेरणीसाठी हीच योग्य वेळ असल्याचा समज शेतकऱ्यांचा झाला आहे. मात्र पेरणीनंतर पाऊस गायब झाला, तर शेतकऱ्यांंचे मोठे नुकसान होते. त्यामुळे मान्सूनचा पाऊस (Monsoon rains) पुन्हा सक्रीय होण्याअगोदर शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, असा सल्ला होसाळीकर यांनी दिला आहे. Sowing | lesser rain expected in the state next week

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट (Crisis of double sowing) ओढावत आहे. जून महिन्यात पाऊस हजेरी लावतो. त्यानंतर शेतकरी पेरण्या करतात. मात्र त्यानंतर पाऊस गायब झाल्यामुळे पेरलेल्या पिकांचे मोठे नुकसान होते. पाऊस गायब होण्याचा हा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून दिसत असून हे संकट टाळण्यासाठी हवामान खात्याच्या अंदाजावर शेतकऱ्यांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षापासून निसर्गचक्र बदलत असून प्रत्येक ऋतु हा साधारण एक ते दीड महिन्यांनी पुढे गेल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून जुलै महिन्याच्या उत्तरार्धात मान्सूनचा सलग पाऊस सुरु होत असल्याची नोंद झाली आहे. तसेच नवरात्रोत्सव आला तरी पावसाळा सुरुच राहत असल्याचे दिसत आहे. बदलत्या ऋतुचक्राचा विचार करून शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title :- Sowing | lesser rain expected in the state next week

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MLA Gopichand Padalkar । गोपीचंद पडळकरांचा घणाघात; म्हणाले – ‘ओबीसी नेत्याचं माकड झालंय’

Career in photography । फोटोग्राफीची आवड आहे? तर मग करिअर? जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार आता भाजपच्या रडारवर? थेट CBI चौकशीचा मांडणार ठराव