बारामती लोकसभा मतदार संघात 14 ठिकाणी विजेचे सबस्टेशन उभारण्याची मागणी

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – गावागावातील घरगुती विजेचा प्रश्न, शेतीसाठी वीज व आद्योगिक विजेच्या वापराचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी बारामती लोकसभा मतदार संघातील सहा तालुक्यातील चौदा ठिकाणी महावितरणच्या माध्यमातून बांधावीत अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

भोर तालुक्यातील भोर, वेळू, न्हावी येथे 33 ×22 केव्ही, मुळशी तालुक्यातील कुंभेरी येथे 33×11 केव्ही,हवेली तालुक्यातील वडकी येथे 33 ×22 केव्ही, पुरंदर तालुक्यातील दिवे व बेलसर येथे 33 ×22 केव्ही,बारामती तालुक्यातील कऱ्हा वागज,करंजे, सुपे येथे 33×11 केव्ही, इंदापूर तालुक्यातील निर्गुडे व झगडेवस्ती येथे 33×11 केव्ही, दौंड तालुक्यातील कानगाव व राजेगाव येथे 33×11 केव्हीचे सबस्टेशन महावितरणच्या माध्यमातून बांधण्यात यावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, बारामती लोकसभा मतदार संघाचे समन्वयक प्रवीण शिंदे,बारामती लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष रविंद कंधारे उपस्थित होते .