आणि रामदेव बाबांचं ‘ते’ वक्तव्य व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – योगगुरु रामदेव बाबा यांचं एक वक्तव्य सध्या व्हायरल झाले आहे. त्यांनी एका न्यूज पोर्टलला मुलाखत देताना त्यांनी नोटाबंदीबद्दल केलेलं ते वक्तव्य चांगलंच व्हायरल झालं आहे. ते म्हणाले की नोटाबंदीच्या काळात पाच लाख कोटींचा घोटाळा झाल्याचा अंदाज आहे. यासाठी त्यांनी बँकेतील अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं आहे.

नोटाबंदीवरून देशभरातील विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत टिकास्त्र सोडले जात आहे. त्यातच रामदेव बाबांनी नोटाबंदीवरून आता केलेलं वक्तव्य सध्या व्हायरल झालं आहे.

काय म्हणाले रामदेव बाबा

मुलाखतीत ते म्हणाले की, बँकेतील लोक किती बेईमान असतील याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधीही केला नाही. त्यामुळे मला असे वाटते की बँकेवाल्यांनी नोटाबंदीच्या काळात लाखो कोटींची लुट केली. हा गैरव्यहार सुमारे ३ ते ५ लाख कोटींचा असल्याची शक्यता आहे. तसेच रामदेव बाबा यांनी या गैरव्यवहारासाठी आरबीआयच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नोटाबंदीच्या नंतर एका सीरीजच्या २ नोटा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर हा मोठा हल्ला आहे. नोटाबंदीच्या काळात रोख रकमेची कमी नव्हती परंतु बँकेतील लोकांनी बेईमान लोकांना सोपविली होती.