Dengue Fever | डेंग्यूचा ताप कधी होतो जीवघेणा, कोणती असतात लक्षणे, एक्सपर्टकडून जाणून घ्या

नवी दिल्ली : Dengue Fever | पावसाळ्यात अनेक प्रकारचे आजार पसरतात. सर्दी-खोकला, फ्लू, डेंग्यूचे रुग्ण वाढतात. परंतु यातील डेंग्यूची (Dengue Fever) लागण खुप धोकादायक असते. दिल्लीत डेंग्यूची लागण झालेल्या बहुतेक रुग्णांच्या जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये डी-२ स्ट्रेन आढळून येत आहे. डेंग्यूचा हा सर्वात घातक प्रकार आहे. चिंतेची गोष्ट म्हणजे, यावर कोणताही विहित उपचार नाही. जर एकदा प्लेटलेट्स कमी होऊ लागल्या तर रुग्णाचा जीव वाचवणे खूप कठीण होते (D-2 strain is the most dangerous strain of dengue).

डेंग्यूचा डी-२ स्ट्रेन कसा ओळखावा

लागण झाल्यास तापासोबत उलट्या आणि जुलाबाचा त्रास होतो. शरीरात पाण्याची कमतरता होते. ज्या लोकांना याआधी डेंग्यू झाला आहे, त्यांना जास्त धोका असतो.

पावसाळ्यात ताप येत असेल, उलट्या, जुलाबाची तक्रार असेल, तर दुर्लक्ष न करता ताबडतोब रुग्णालयात जाऊन उपचार करा. इम्युनिटी कमकुवत असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.

होमरेजिक तापाचे कारण ठरू शकतो डी-२ स्ट्रेन

डेंग्यूचा डी-२ स्ट्रेन प्राणघातक ठरू शकतो. पीडित रुग्णाला होमरेजिक ताप येतो.
ताप खूप वाढतो. त्यामुळे इंटर्नल ब्लीडिंग होते. अशावेळी रुग्णाची प्रकृती बिघडू लागते.
काही प्रकरणांमध्ये, मल्टी ऑर्गन फेल्यूअर देखील होते. अशावेळी बचाव खुप आवश्यक आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Benefits of Karonda | आरोग्यासाठी अमृत समान आहे ‘हे’ छोटे लाल फळ,
कॅन्सरपासून सुद्धा वाचवू शकते, कसे वापरावे जाणून घ्या