Dengue | डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी झाल्यास शरीरात दिसतात ही ६ लक्षणे, ताबडतोब करा उपचार

नवी दिल्ली : Dengue | डॉक्टरांच्या माहितीनुसार, डेंग्यूचा ताप (Dengue Fever) आल्यानंतर तीन ते चार दिवसांत कमी होऊ लागतो. या काळात शरीर दुखण्याची तक्रार असते. यापेक्षा जास्त लक्षणे दिसत नाहीत. पण डेंग्यूमुळे हेमरेजिक फिव्हर (Hemorrhagic Fever) झाल्यास शरीरातील प्लेटलेट्सची (Platelets) पातळी घसरू लागते. यामुळे रुग्णाची स्थिती बिघडू शकते. काही प्रकरणांमध्ये, मृत्यूचा धोका देखील असतो. डेंग्यूमुळे (Dengue) एखाद्याच्या शरीरात प्लेटलेट्स कमी होऊ लागल्या असतील तर ही ६ प्रकारची लक्षणे आवश्य दिसतात.

ही आहेत लक्षणे

  • अशक्तपणा आणि थकवा
  • शरीरावर पुरळ
  • उलटी, अतिसार
  • चक्कर येणे
  • स्नायू दुखणे
  • हिरड्या आणि नाकातून रक्तस्त्राव

किती असावी प्लेटलेट्सची पातळी
सफदरजंग हॉस्पिटलमधील डॉ. दीपक कुमार सुमन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, की डेंग्यूमध्ये (Dengue) प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात प्लेटलेट्स कमी होत नाहीत, हे फक्त काही प्रकरणांमध्ये होते. विशेषतः कमकुवत इम्युनिटी असलेल्या लोकांमध्ये अशी प्रकरणे जास्त दिसतात. सामान्य व्यक्तीच्या शरीरातील प्लेटलेट्सची पातळी १.५ लाख ते ४.५० लाख प्रति मायक्रोलिटर असते. डेंग्यूच्या काही प्रकरणांमध्ये ही पातळी कमी होत राहते.

जर ते १ लाखांपेक्षा कमी झाले तर ते लो प्लेटलेट काउंट मानले जाते, परंतु यामुळे घाबरू नका. जर प्लेटलेट्सची पातळी २० हजारांपेक्षा जास्त असेल तर धोक्याचे काही कारण नाही. मात्र त्यापेक्षा कमी झाल्यास ही स्थिती धोकादायक ठरू शकते. अशावेळी रुग्णाला प्लेटलेट्स देण्याची गरज असते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Loan Scheme | शहरात घर खरेदी करणाऱ्यांना मिळणार स्वस्त लोन, सरकारी स्कीम कधी येणार, जाणून घ्या