भारत पाक तणाव ; तरीही व्यापार सुरूच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यामुळे भारत पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. तरीही दोन्ही देशातील व्यापारावर काहीही परिणाम झालेला नाही. तसेच भारतातून गुरुवारी ३४ ट्रक पाकिस्तानला गेले, तर पाकमधून १४ ट्रक भारतात आले. हा व्यापार पूंछ भागातील चाकण-दा-बाग येथून हा व्यापार चालतो. सामानांचे ट्रक नियंत्रण रेषा ओलांडून एकमेकांच्या देशात ये-जा करत आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडलेला नाही. यापूर्वीही दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला, तेव्हा ही व्यापार सुरूच होता.

तसेच मंगळवार ते शुक्रवार या चारही दिवशी दोन्ही बाजूंनी सामानाचे ट्रक येत जात होते. तरीही व्यापारावर गेल्या मंगळवारपासून कोणताही परिणाम झालेला नाही. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली होती त्या दिवशीही दोन्ही बाजूंनी व्यापार सुरू होता. त्या दिवशी भारतातून ३५ ट्रक पाकिस्तानमध्ये गेले होते, तर पाकिस्तानातून १५ ट्रक भारतात आले होते.

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. तर पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांकडून करण्यात आलेल्या कृत्याचा बदला घेण्याची मागणीही देशभरातुन करण्यात येत आहे. मात्र, पाकिस्तानसोबत असलेला व्यापार बंद केल्यास त्याचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होईल. त्यामुळे पाकिस्तानचा बदला घेण्याचा हा उत्तम मार्ग ठरू शकतो.

पाकिस्तानला कमकुवत करण्याचा प्रयत्न भारत सहज करू शकतो. पाकिस्तानमध्ये विशेष विदेशी कोणतीही गुंतवणूक येत नाही. पाकिस्तानातील अशी गुंतवणूक केवळ २५००-३००० दशलक्ष डॉलरच्या आसपास आहे. खुद्द पाकिस्तानचे उद्योजक अंतर्गत अर्थव्यवस्थेमुळे बांगलादेशात गुंतवणूक करणे अधिक पसंत करतात. अशा पाकिस्तानी उद्योगाला उभे राहण्यास वाव मिळणार नाही, अशी व्यवस्था भारताला करणे शक्य आहे, कारण बांगलादेश हा पाकिस्तानपेक्षा सक्षम असला तरी भारतापेक्षा बराच कमकुवत आहे. त्यामुळे याबाबत बांगलादेशला आपल्या शब्दात ठेवणे शक्य आहे.

अमेरिका, रशिया, अफगाणिस्तान या भारताच्या मित्र राष्ट्रांना पाकिस्तान अधिक निर्यात करतो. भारत या देशांशी असलेल्या चांगल्या संबंधांचा वापर करू शकतो. पाकिस्तानची परकीय गंगाजळी केवळ १८ अब्ज डॉलर आहे. त्यामुळे आयात वाढवण्याची आणि निर्यात घटल्याची वेळ आल्यास पाकिस्तानच्या आर्थिक गंगाजळीवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. मात्र, एकीकडे पाकिस्तानचे हे बंद केलं ते बंद केलं, असे राजकीय नेते सांगत आहेत. तर पाकिस्तानचं पाणी बंद करू असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले होते. पण, अद्यापही पाकिस्तानशी व्यापार होतच असल्याचे दिसून येते.