बिगारी सुपरवायझरला २० हजारांची लाच घेताना अटक

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

बांधकाम परवानगी नकाशाची प्रत देण्यासाठी २५ हजारा रुपयांच्या लाचेची मागणी करुन २० हजारांची लाच स्विकारताना बिगारी सुपरवायझरला रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आज (गुरुवार) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शिवाजीनगर येथील दिलीप टी हाऊस येथे केली.

गोपीचंद दत्तात्रय पठारे  (वय-३५ रा.भाडळे वस्ती, शेवाळवाडी, ता हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर सुपरवायझरचे नाव आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
[amazon_link asins=’B0126ZASPI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4c1daa7a-ac6f-11e8-b903-072465116448′]
तक्रारदार यांचे काकांनी बीजी शिर्के रोडवरील सह्याद्री पार्क मधील सर्वे नं. ४८ या ठिकाणी २००४मध्ये बांधकाम केले आहे.  तक्रारदार यांनी बांधकाम परवानगी नकाशाची प्रत मिळवण्यासाठी तसेच २००४ साली दिलेल्या नियमितकरणाचा दाखला प्रमाणीत करण्यासाठी अर्ज केला होता. दाखला आणि बांधकाम परवाना नकाशा देण्यासाठी पठारे याने तक्रारकडे २५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीमध्ये २० हजार रुपये देण्याचे ठरले. आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शिवाजीनगर येथील दिलीप टी हाऊसमध्ये ही रक्कम स्विकारताना पठारे याला रंगेहाथ अटक करण्यात आली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, अर्चना दौंडकर आणि त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हिवरकर हे करीत आहेत.

जाहिरात