महाराष्ट्र हातून गेल्यानं भाजपच्या PM मोदी – HM शहा ‘दिग्विज’यांचा ऐतिहासिक ‘पराभव’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात राजयकारणात आज मोठी घडामोड पहायला मिळाली. शनिवारी भाजप आणि अजित पवार गटाने सत्ता स्थापनेचा दावा केला आणि शपथविधीही उरकला. मात्र, आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अजित पवार यांची मनधरणी करण्यात शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना यश आले. अखेर 79 तासांचे फडणवीस सरकार कोसळले.

फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयामागे बहुत चाचणीत येणारे अपयश हे प्रमुख कारण असू शकते. सर्वोच्च न्यायालयाने 27 नोव्हेंबरला 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची वेळ दिली होती. मात्र, ऐनवेळी राजीनामा दिल्याने भाजपची मोठी गोची झाली. बहुमताचा 145 चा आकडा गाठता येणार नसल्याने देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा देण्याची नाचक्की ओढावली.

दरम्यान, फडणवीस यांच्या राजीनाम्याआधी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी महाराष्ट्राबद्दल तासभर चर्चा केली होती. जे.पी. नड्डा हे देखील या बैठकीला उपस्थित होते. अमित शहा आमि नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवर चर्चा केली. मात्र, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना राज्यातील परिस्थिती बदलता आली नाही. अजित पवारांना थांबवण्यात अपयश आल्यानंतर नाचक्की होण्याआधीच दिल्लीतून देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा देण्याचा निर्णय घेतला गेला असल्याचे बोलले जातेय.

मोदी-शहा यांच्या या नैतिक पराभवावर काँग्रेसचे वेणुगोपाल यांनी प्रतिक्रीया देली. ही संविधानाचा आणि लोकशाहीचा विजय आहे. त्यांना वाटले होते घोडेबाजार करुन सरकार स्थापन करतील. मात्र, हा फक्त देवेंद्र फडणवीस यांचा पराभव नसून हा दिल्लीतील त्यांच्या नेतृत्वालाही चपराख असल्याची टीका वेणुगोपाल यांनी केली.

Visit : Policenama.com