Devendra Fadnavis | शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्वतंत्र संस्था उभारणार (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था, विकासाला चालना देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केंद्रातील नीती आयोगाच्या (NITI Aayog) धर्तीवर महाराष्ट्रात स्वतंत्र अशी संस्था उभारण्यात येणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन (Institute of Transformation) असे या संस्थेचे नाव असेल. ही संस्था शेती, आधुनिक तंत्रज्ञान, ब्लॉकचेन आणि दळवण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे काम करेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

या संदर्भात माहिती देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आज मुख्यमंत्र्यांच्या (CM) अध्यक्षतेखाली नीती आयोगासोबत एक बैठक झाली. नीती आयोगाचे सीईओ आणि संपूर्ण टीम या बैठकीला उपस्थित होती. मूळातच या बैठकीचं उद्दिष्ट असं होतं, की नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील एक इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ही त्यार करायची. त्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारच्यावतीने आम्ही देखील सादरीकरण केलं. विविध सेक्टरमध्ये कशाप्रकारे मदत होऊ शकते याबाबत नीती आयोगाने देखील सादरीकरण केले. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीला तत्वत: संमती दाखवली आहे, की अशा प्रकारची एक संस्था आम्ही महाराष्ट्रात निर्माण करु. लवकरच या संदर्भात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet) निर्णय आम्ही घेऊ. ही संस्था कशी असेल, त्या अंतर्गत काय येईल या सर्व बाबी मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आपल्या पर्यंत पोहचवण्यात येतील.

 

 

उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, निती आयोगासारखी राज्यस्तरीय संस्था राज्यात स्थापन करण्यासाठी वित्त विभागाने (Finance Department) चांगली तयारी केली आहे. राज्याने 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे (Economy) उद्दिष्ट ठेवले आहे, मात्र आपण अधिक चांगले काम केलं तर 2027 मध्येच हे उद्दिष्ट गाठू शकतो, असे त्यांनी सांगितले.

ॲसेट मॉनिटायजनेशन (Asset Monetization) हा महत्वाचा मुद्दा निती आयोगाने मांडला असून
त्या दृष्टीने राज्यात नव्याने साकारण्यात येत असलेला समृद्धी महामार्ग (Samriddhi Highway)
हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. ई मोबिलीटीच्या (E-Mobility)
क्षेत्रात राज्याने पुढाकार घेतला असून पुढील तीन वर्षांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ईलेक्ट्रीक वाहनांचा (Electric Vehicles) वापर वाढविणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

 

ब्लॉकचेन, ड्रोन यंत्रणेचा वापर महसुल, कृषी, आरोग्य विभागात वाढविण्यावर भर असल्याचे सांगत राज्यातील दुर्गम
भागात ड्रोनद्वारे औषध पोहोचविण्याचा प्रयत्न राहील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील कृषी क्षेत्रात सौरउर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात येणार असून पुढील सौरउर्जेच्या माध्यमातून
तीन वर्षांत सुमारे चार हजार मेगा वॅट वीज कृषीपंपांना उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | an institution will be set up in maharashtra on the lines of niti aayog devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

T20 World Cup | विराट कोहली सलामीला खेळणार? कर्णधार रोहित शर्मा म्हणाला…

Narayan Rane | नारायण राणे यांची उध्दव ठाकरेंवर बोचरी टीका; म्हणाले – ‘अस्तित्व आहेच कुठे?… ते फक्त मातोश्रीच्या कक्षेत’

Pune Crime | दुर्देवी ! सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा हत्ती टाकीत पडून मृत्यू