Homeताज्या बातम्याDevendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांंची टीका; म्हणाले - ​'शिवसेनेचा पासिंग स्ट्राईक रेट...

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांंची टीका; म्हणाले – ​’शिवसेनेचा पासिंग स्ट्राईक रेट होता, पण आमचा…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवणाऱ्या टीएमसीच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या काल (बुधवारी) महाराष्ट्र दौ-यावर होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) रुग्णालयात दाखल असल्यामुळे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये (mumbai trident hotel) जाऊन ममता यांची भेट घेतली. ममता यांच्या दो-यावरुन भाजप पक्षाकडून टीका होत असताना शिवसेनेनेही भाजपला (BJP) प्रत्युत्तर दिलंय. या पार्श्वभुमीवर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) हल्लाबोल केला आहे.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘शिवसेनेचा स्ट्राईकरेट हा आमच्यापेक्षा कमी होता, अशी आठवणही फडणवीसांनी संजय राऊत आणि शिवसेनेला करून दिलीय. तर, संजय राऊतांनी भाजपावर टीका केल्यानंतर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘संजय राऊत इतक्या मोठ्या बाता करतायत, त्यांचे किती निवडून आले? 56 निवडून आले आहेत. त्यांचा 40-42 टक्के असा पासिंग स्ट्राईकरेट होता. आमचा 70 टक्के होता. त्यामुळे कुणाला महाराष्ट्रातल्या लोकांनी पळवून लावलं हे निवडणुकीतून स्पष्ट झालंय, ते पुढच्या निवडणुकीतही स्पष्ट होईल.

 

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ‘भाजपाविरोधी विरोधकांची आघाडी करण्याच्या प्रयत्नांवर आणि
शिवसेनेच्या समर्थनावरही फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडलं.
‘मला वाटतं की संजय राऊत असतील किंवा शिवसेना असेल, यांनी कितीही लांगुलचालन केलं, तरी त्यांना फायदा होणार नाही.
पण एक चांगलंय. आता मतांच्या लाचारीमध्ये त्यांना हिंदुत्वविरोधी पक्षांना डोक्यावर घेऊन हिंडावं लागतं,
हा त्यांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे, असं फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis mocks sanjay raut shivsena on mamata banerjee sharad pawar meet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News