Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांकडून आणखी एक गौप्यस्फोट; ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिवेशनात सभागृहात पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला होता. व्हिडीओ क्लिप दाखवत राज्यातील राजकारणात खळबळ उडवून दिली होती. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Special Public Prosecutor Praveen Chavan) आणि काही पोलीस अधिकारी (Police officer) यांची मदत घेत विरोधी पक्षामधील नेत्यांच्याविरोधात षडयंत्र (Conspiracy) करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप फडणवीसांनी केला होता. मात्र प्रवीण चव्हाण यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. आता पुन्हा फडणवीसांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.

 

फडणवीसांनी केलेल्या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही. भाजपचा (BJP) हा केविलवाणा प्रयत्न आहे. व्हिडीओमधील आवाज मॅन्युपिलेट (Manipulator) केले आहेत. याबाबत स्टिंग ऑपरेशनच्या (Sting Operation) संदर्भात चौकशी (Inquiry) झाल्यावर सत्य बाहेर येईल, असं प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं होतं.

मी सुद्धा एक वकील (Lawyer) आहे त्यामुळे मला माहिती होतं की हे काय डिफेन्स घेणार आहेत.
याची काळजी मी आधीच घेतली आहे. माझ्याकडे जे फुटेज आहे त्याचं एक फॉरेन्सिक ऑडिट (Forensic audit) मी करुन घेतलं असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
त्यासोबतच माझ्याकडे सव्वाशे तासाच्या व्यतिरिक्त आणखी काही पुरावे आहेत.
ही केस सीबीआयकडे (CBI) गेल्यावर ते पुरावे सादर करणार आहे.
राज्य पोलीस (Maharashtra Police) माझी कोणत्याही प्रकारची चौकशी करू शकत नाहीत,
असंही फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 

दरम्यान, राज्य सरकारवर (Maharashtra Government) विधानसभेत फडणवीसांनी आरोप केले होते.
मात्र आता चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर फडणवीसांनी पुन्हा नवीन गौप्यस्फोट केल्याने राज्य सरकारच्या अडचणीत वाढ झाल्यासारखं आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis reveal big information after sting operation pen drive bomb read what he said

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा