… म्हणून देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री ‘पद’ गेलं, लोकांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरही १९ दिवसात सरकार स्थापन होऊ न शकल्याने राज्यपालांनी शेवटी राष्ट्रपती राजवट जारी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काळजीवाहू मुख्यमंत्री पदही गेले. तेव्हा पर्यावरणप्रेमींनी हा ‘आरे’ चा शाप असल्याचे टिष्ट्वट करुन फडणवीस यांची खिल्ली उडविली आहे.

निवडणुकीच्या काळातच मेट्रोच्या कारशेड साठी आरे जंगलातील २ हजारांहून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली होती. रात्रीतून झालेली ही कत्तलविरोधात लोकांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलनही केले होते. ही कत्तल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोखू शकले असते. पण, त्यांनी ती रोखली नाही. त्याचा राग पर्यावरणप्रेमींमध्ये आहे. देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची गेल्यानंतर लोकांनी हा ‘आरे’ चा शाप असल्याची पोस्ट सोशल मिडियावर करुन फडणवीस यांना टरगेट केले आहे.

सोशल मिडियावर फडणवीस यांना उद्देशून लिहिताना काही जणांनी म्हटले की, तुम्ही ‘आरे’ तील वृक्षतोड थांबवू शकला असता. पण तुम्ही परवानगी दिली. आता निसर्गच न्यायासाठी रडत आहे.
‘आरे’ का शाप अशी टॅगलाईन खाली अनेकांनी फडणवीस यांच्यावर झोड उठविली आहे.

Visit : Policenama.com