Devendra Fadnavis | ‘नाकाखालून 40-50 लोकं निघून गेली, युती तोडल्याचा वचपा काढला’- देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला (BJP-Shivsena Alliance) स्पष्ट बहुमत दिले होते. मात्र शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी करत भाजपसोबतची युती तोडून राष्ट्रवादी (NCP)-काँग्रेससोबत (Congress) महाविकास आघाडी केली. शिवसेनेच्या या भूमिकेवर आणि राज्यातील नवीन सरकार स्थापनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. राज्यात स्थापन झालेलं नवं सरकार आणि महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळणं हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांना उत्तर आहे. उद्धव ठाकरेंनी युती तोडली होती. त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसलं. त्याला आता प्रत्युत्तर देण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे मला उद्देशून अनेकदा आपल्या भाषणात म्हणायचे की, माझं सरकार पाडून दाखवा. ते सतत आपल्या भाषणात तसं म्हणायचे. त्यामुळे मी एकेदिवशी सांगितले की, ज्या दिवशी सरकार कोसळेल त्या दिवशी तुम्हालाही कळणार नाही आणि तसंच घडलं. 40-50 आमदार चालत गेले तरी त्यांना माहिती पडलं नाही की, त्यांच्या नाकाखालून 40-50 लोक निघून गेली.

 

त्याच दिवशी हे निश्चित झालं
एक बात पक्की आहे. ज्यादिवशी त्यांनी आमच्या पाठित खंजीर खुपसला त्याच दिवशी हे निश्चित झालं होतं की त्याच प्रत्युत्तर दिलं जाणार. पण ते प्रत्युत्तर कशाप्रकारे दिलं जाणार हे निश्चत नव्हतं. मात्र तशी परिस्थिती बनत गेली. शिवसेना फुटण्यामागे एक व्यक्ती जबाबदार आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे. दुसरं कुणीही जबाबदार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

जे घडलं ते एका दिवसात नाही घडलं
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) प्रखर हिंदुत्ववादी (Hindutva) होते.
पण उद्धव ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका सौम्य झाली होती. मग अशावेळी मत मागायला जाताना लोकांना काय सांगायचे? असा विचार आमदारांना सतावत होता. शिवसेनेच्या आमदारांना (Shivsena MLA) शिवसेनेच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादी मजबूत होताना दिसत होती. अशी परिस्थिती ज्यावेळी निर्माण होते तेव्हा आम्ही तर राजकीय पक्ष आहोत. त्याचा फायदा तर घेणारच. तो फायदा आम्ही घेतला. पण हे जे काही घडलं ते एका दिवसात नाही घडलं. बऱ्याच कालावधीत हे सगळं घडलं. त्यांच्यासोबत अन्याय झाल्याने ते आमच्यासोबत आले, असेही फडणवीसांनी सांगितलं.

 

Web Title :- Devendra Fadnavis | dcm devendra fadnavis slams uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nitin Gadkari | ‘मी सरकारमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगतोय, सरकारच्या भरवश्यावर राहू नका’, नितीन गडकरींची टोलेबाजी (व्हिडिओ)

Shinde Government | शिंदे गटाला झटका! सुप्रीम कोर्टाच्या ‘या’ निर्णयामुळे आमदाराची उडणार दांडी

Supreme Court | सरकारसाठी धडा आहे SC चा निर्णय ! 2 वर्षापासून जेलमध्ये बंद असलेल्या पत्रकाराला सोडताना काय-काय म्हटले, जाणून घ्या