Andheri East Bypoll | भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार का घेतली? ‘ही’ आहेत कारणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक (Andheri East Bypoll) बिनविरोध व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून मुरजी पटेल (Murji Patel) यांची उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief  Sharad Pawar) यांनी सुद्धा पोटनिवडणूक (Andheri East Bypoll) बिनविरोध करावी अशी विनंती सर्व पक्षांना केली होती. त्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत आज भाजपाने निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली.

 

या सर्व घडामोडीनंतर विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अनेकांनी ठाकरे-पवार आणि भाजपामधील (BJP) या घडामोडींवर शंका व्यक्त केली आहे. शिवाय, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने (Congress) तर या घडामोडीला एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) निवडणुकीचा वास येत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

 

या पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll) प्रथम शिवसेना उमेदवार ऋतुजा लटके (Shivsena Candidate Rituja Latke) यांना निवडणूक रिंगणात उतरण्यापासून अटकाव करण्यासाठी त्यांचा राजीनामा लटकवून ठेवण्यात आला होता. त्यानंतर ऋतुजा लटके यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्याची खेळी सुद्धा करण्यात आली. यावरून शिंदे गटावर जोरदार टीकाही झाली होती. अखेर कोर्टाने कानउघडणी केल्यानंतर तातडीने लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आणि लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

दिवंगत आमदाराच्या पत्नीचा राजीनामा लटकवून ठेवण्याची खेळी करणार्‍या शिंदे गट-भाजपाने नंतर राज ठाकरे आणि शरद पवारांच्या आवाहनावर विचार करून माघार घेतल्याने यात काहीतरी राजकारण असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय दरम्यानच्या काळात ऋतुजा लटके यांना शिंदे गटात येण्याची ऑफर सुद्धा देण्यात आल्याचे वृत्त होते. आता भाजपने पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

या पोटनिवडणुकीत पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या आहेत. पण भाजपने नेमकी माघार घेण्याची काय-काय करणे आहेत यावर सध्या चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर लोक अनेक कारणे व्यक्त करत आहे. कोल्हापूर, देगलूर आणि पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अशी थेट लढाई झाली होती. पण अंधेरीच्या लढाईत माघार घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

 

दरम्यान, अंधेरी पुर्व निवडणुकीत मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला.
तर भाजपा उमेदवार मुरजी पटेलांच्या कार्यकर्त्यांनी निराशा व्यक्त केली आहे.
राज ठाकरे आणि शरद पवारांच्या विनंतीनंतर भाजपाने 24 तासात आपला उमेदवार मागे घेतला.
या पाठीमागे नक्कीच काहीतरी राजकारण आणि पुढील राजकीय खेळ्या असू शकतात.

 

भाजपच्या माघारीची कारणे खालील प्रमाणे असू शकतात…

दिवंगत आमदार रमेश लटकेंच्या निधनानंतर त्यांची पत्नीच निवडणूक मैदानात उतरल्याने असलेली सहानुभूतीची लाट.

शिवसेना उमेदवार ऋतुजा लटकेंचा बीएमसी सेवेतील राजीनामा नामंजूर करणे, हायकोर्टात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणे, यामुळे ऋतुजा लटकेंच्या सहानभुतीत झालेली वाढ.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची व्होट बँक मजबूत असल्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचाही पाठींबा असल्याने शिवसेनेची ताकद प्रचंड वाढली.

मुंबई महापालिका तोंडावर या पोटनिवडणुकीतील पराभव भाजपाला अडचणीचा ठरणार आहे.

भाजप उमेदवार मुरजी पटेल यांचे नगरसेवक अपात्रता प्रकरणात निवडणूक न लढवण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना कोर्टात जाण्याच्या तयारीत होती.

येत्या काळात भाजपच्या मतदारसंघात पोटनिवडणूक लागल्यास महाविकास आघाडी एकत्र लढल्यास भाजपला अडचणीचे ठरले असते.

 राज्यात सत्ता असतानाही पराभव झाल्यास सरकारची नामुष्की ठरली असती. शिंदे गटाची ताकद स्पष्ट झाली असती.

Web Title :- Andheri East Bypoll | Why did BJP withdraw from Andheri by-election? ‘These’ are the reasons

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | भाजपच्या माघारीनंतर शरद पवार पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर बोलले, म्हणाले- ‘माझी भाजपकडे मागणी नव्हती, तर…’

Sanjay Raut | राज ठाकरेंचे भाजपला दिलेले पत्र हा केवळ स्क्रिप्टचा भाग, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

Mandakini Khadse | जळगाव दूध संघातील अपहार प्रकरणात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल