Devendra Fadnavis | महापालिका निवडणुकांबात फडणवीसांचं मोठं विधान, विरोधकांना म्हणाले… (व्हिडिओ)

बारसूतील आंदोलकांना बंगळुरूतून फंडिंग, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुका (Mumbai Municipal Corporation Election) रखडल्या आहेत. अनेक महापालिकांचे कामकाज प्रशासकांमार्फत सुरु आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारमुळे (State Government) या निवडणुका रखडल्याचा दावा विरोधकांनी केला होता. मात्र विरोधकांचा हा दावा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खोडून काढला आहे. राज्य सरकारने निवडणुका अडवून ठेवलेल्या नाहीत, असं फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

विधानपरिषदेत (Legislative Council) अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, निवडणूक घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. निवडणूक घेण्याचा अधिकार मुंबई महापालिका 1888 कलम 18(1) अन्वये महापालिकेच्या सर्व निवडणुका घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोगाने 4 ऑगस्ट 2022 अन्वये महापालिकेला सार्वत्रिक प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले आहेत. जाणीवपूर्वक सांगतो, मुंबई महापालिकेसहीत (BMC Election) सर्व पालिकेच्या आम्हाला निवडणुका हव्या आहेत. आम्ही तयारीत आहोत. आम्हाला निवडणूका पाहिजेत. पण सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पुढे जाता येत नाही. तरीही आपल्याला वाटत असेल तर निवडणूक आयोग (Election Commission) स्वायत्त आहे. तुम्ही जाऊन त्यांच्याकडे माहिती घ्या. नसेल तर सर्व मिळून आपण एकत्र जाऊ आणि निवडणूक घेण्याची मागणी करु, असं आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केलं.

बारसू आंदोलनाला बंगळुरूतून फंड

बारसू रिफायनरीला (Barsu Refinery) विरोध म्हणून विरोधकांनी केलेल्या आंदोलनावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही लोक ज्यांना या देशाचा विकास नको आहे, तिचं माणसं आपल्याला आरेच्या आंदोलनात, बुलेट ट्रेनच्या आंदोलनात (Bullet Train Project), तीच माणसं बारसूच्या आंदोलनात आणि यातील काही माणसं नर्मदेच्या आंदोलनात देखील होती. आपण जर यांचा रेकॉर्ड ट्रेस केला तर वारंवार ही माणसं बंगळुरुला जातात. त्यांच्या अकाऊंटमध्ये तिथून पैसे येतात.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रीनपीस ज्या संघटना आहे त्यावर आपल्याकडं बंदी घातलेली आहे.
त्याचे जे माजी सदस्य आहेत. त्यांच्या संपर्कात हे लोक असतात.
त्यामुळं हे फक्त गावकऱ्यांपुरतं मर्यादित नाही, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Farmers Day | राज्यात 30 ऑगस्ट हा दिवस ‘शेतकरी दिन’ म्हणून साजरा होणार