Devendra Fadnavis | कांदा निर्यातबंदीबाबत फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती, शेतकऱ्यांना दिले ‘हे’ आश्वासन

नागपूर : Devendra Fadnavis | कांद्याच्या प्रश्नावर मी स्वतः केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र निर्यात बंदी (Onion Export Ban) मागे घेतली तर कांद्याचा मोठा तुटवडा निर्माण होणार आहे. कारण यंदा २५ ते ३० टक्के कमी कांदा बाजारात आला आहे. मात्र तरीही आम्ही केंद्र सरकारला (Central Govt) मार्ग काढण्याची विनंती केली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज सभागृहात दिली.

कांदा निर्यातबंदीवरून देशभर केंद्र सरकारवर टीका होत आहे. महाराष्ट्रात सुद्धा विरोधीपक्ष आक्रमक झाले आहेत. सर्वत्र आंदोलने सुरू आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनीही आक्रमक होत आज चांदवड येथे रास्तारोको आंदोलनात सहभाग घेतला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारची बाजू मांडत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.

शेतकऱ्यांना आश्वासन देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांचे आम्ही अजिबात नुकसान होऊ देणार नाही.
लिलावात अडचणी आल्या तर सरकार दर जाहीर करून कांदा खरेदी करेल.

मागील वेळी काही राष्ट्रीयकृत बँकांनी कांद्याचे अनुदान दिले नाही, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना
देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण अनुदान वितरित केले आहे. ते कुणी दिले नसेल आणि कर्ज खात्यात वळते केले असेल,
तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

कांदाप्रश्नावर निर्माण झालेली कोंडी सोडवण्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी
राज्याचे कृषीमंत्री आणि पणनमंत्री पुन्हा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना भेटणार आहेत. यातून नक्कीच मार्ग निघेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | साहू प्रकरणावरून संजय राऊतांचा भाजपावरही भ्रष्टाचाराचा आरोप, नाव घेतल्याने प्रसाद लाड संतापले

Uddhav Thackeray | दिशा सालियान प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा, ”…अन्यथा तुमच्या कुटुंबीयांची SIT चौकशी लावू”

BJP MLA Prasad Lad | काळापैशाचा आरोप केल्याने भाजपा आमदार प्रसाद लाड संतापले, संजय राऊतांना केली शिवीगाळ, म्हणाले…

CM Eknath Shinde | ”सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय म्हणजे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ”, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे अभिनंदन