Devendra Fadnavis | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले,-‘बिनविरोध होण्यासाठी…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (By-Elections) होत आहे. शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्ष बिनविरोध निवडणुकीऐवजी या मतदारसंघात उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणुका बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती करणार, मात्र विनंती मान्य करायची की नाही हे त्यांनी ठरवायचे आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले, महाविकास आघाडीने अनेकवेळा केलेली विनंती आम्ही मान्य केली आहे. आता त्यांनी काय करायचे हे त्यांनी ठरवायचे आहे. मात्र, मला वाटते निवडणुका न होता बिनविरोध उमेदवारांना निवडून देणे हे सर्वांसाठी योग्य राहील, असे फडणवीस म्हणाले.

 

सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी स्विकारली आहे. त्यांच्या या पवित्र्यावर काँग्रेस नाराज असून त्यांच्यावर टीका होत आहे, यासंदर्भात फडणवीस यांना विचारले असता, सत्यजीत तांबे हे अपक्ष उभे आहेत, त्यांना काँग्रेसने निलंबित केले आहे. तिथली नेमकी परिस्थिती काय? हे माझ्या ऐवजी त्यांना विचारायला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

 

यावेळी त्यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये (Cabinet Expansion) महिलांना स्थान मिळणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी होकारार्थी उत्तर देत शंभर टक्के महिलांना स्थान मिळेल असे सांगितले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis reaction on kasba by election in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | PMPML च्या पिंपरी आगारातील बेंच फिटरने बनवले ‘फिरते वॉशिंग’ सेंटर, तीन दिवसांत निर्मिती

Nilesh Rane On Aaditya Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले; म्हणाले…

Pune News | ‘समाजाप्रती आमच्या जबाबदाऱ्या’ यावर मोती मस्जिदमध्ये सुसंवाद, समर्थ पोलिसांचा चांगला उपक्रम