Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे गटाला प्रत्युत्तर, ”उबाठा सेनेने हिंदूचा अपमान करणे बंद करावे”

मुंबई : Devendra Fadnavis | ज्यांचे राम मंदिर (Ram Mandir) आंदोलनात कसलेही योगदान नाही, ते लोक असे आरोप करुन स्वत:चे हसे करुन घेत आहेत. कोट्यवधी हिंदूचा अपमान करत आहेत. आता तरी उबाठा सेनेने अशाप्रकारे हिंदूचा अपमान करणे बंद करावे, असे प्रत्त्युतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे गटाला (Thackeray Group) दिले आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी म्हटले होते की, मंदिर वही बनाएंगे… असा नारा देणाऱ्यांनी मंदिर नीट जाऊन पाहावे. अयोध्येतील राम मंदिर मुख्य स्थळापासून ३ ते ४ किलोमीटर दूर बांधले आहे. ज्या ठिकाणी अयोध्येत राम मंदिर बनवण्याचे ठरले होते. त्या ठिकाणी ते मंदिर बांधलेले नाही.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील प्रत्युत्तर दिले.

आयोध्येत ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे मंदिर उभारले जात आहे, ते पाडलेल्या बाबरी मशिदीच्या स्थानापासून तीन ते चार
किलोमीटर दूर बांधले आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
यावर केंद्र सरकारकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, असा आरोप करणे म्हणजे हिंदूचा अपमान आहे, असे आज देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस यांनी आज जाणीवपूर्वक शिवसेना ठाकरे गटाचा उल्लेख उबाठा असा करत उद्धव ठाकरे यांना डिवचले.
कारण, मागील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असाचा उल्लेख केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संताप
व्यक्त केला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | पंतप्रधानांवर शरद पवारांची जोरदार टीका, ”मोदी देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी उपवास…”

Bacchu Kadu | बच्चू कडूंनी मराठा आरक्षणासंबंधी दिली महत्वाची माहिती, ”सरकारकडून मसूदा तयार, आता…”

न्याती कंपनीच्या ध्यान मंदिराच्या घुमटावरुन पडून कामगाराचा मृत्यू, कॉन्ट्रॅक्टरवर FIR

पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला अटक

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, ”सरकारकडून माझ्यावर डाव, मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि…”

PCMC Water Supply | पिंपरी चिंचवड परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद