Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब; महाविकास आघाडी सरकारला आणखी एक झटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात आणखी एक पेन ड्राईव्ह (Pen Drive) बॉम्ब फोडला आहे. आज सादर केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये, दोन व्यक्तींचं संभाषण असून ती दोन माणसं दाऊदची (Underworld Don Dawood Ibrahim) असून त्यांची मुस्लिम वक्फ बोर्डात (Muslim Waqf Board) नियुक्ती करण्यात आली आहे. असा दावा देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केला आहे.

 

देवेंद्र फडणवीसांनी जी नावं घेतली आहेत त्यातील एकाचं नाव मोहम्मद अर्शद खान (Mohammad Arshad Khan) आणि दुसऱ्याचं नावं डॉ. मुदाससीर लांबे (Dr. Mudassir Lambe) असं आहे. या दोघांनाही अल्पसंख्यांक विभागाने वक्फ बोर्डावर सदस्य (Members) म्हणून नेमलं आहे. यातील 31 जानेवारी 2020 लांबे यांच्याविरोधात एका महिलेने लग्नाचं आमिष दाखवत बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. या महिलेने आत्महत्या करण्याचा इशारा दिला तरी त्यांच्यावर कारवाई झाली नाही. मात्र 28 जानेवारी 2022 मध्ये महिलेच्या पतीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केल्याचं देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितलं.

 

फडणवीसांनी सादर केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये, डॉ. लांबे म्हणत आहेत की, माझे सासरे दाऊदचे उजवा हात (Dawood Ibrahim Right Hand) होते.
माझ्या लग्नात हसीना पारकर, इकबाल कासकर यांची पत्नी मध्यस्थी होती.
त्यामुळे जर काही झालं तर लगेच वरपर्यंत प्रकरण पोहोचतं. माझे सासरे संपूर्ण कोकण पाहायचे.
त्यानंतर अर्शद खान बोलतात, तु त्यांच्यासोबत अन्वरचं ऐकलं असेल ते माझा काका होते.
तेसुद्धा त्यांच्यासोबत राहत होते आताच त्यांचं निधन झालं.
मुंबईमध्ये ते पाहायचे तेव्हा मी मदनपुरात होतो, भेंडीबाजारमध्ये (Bhendi Bazaar) माझा जन्म झाला आहे.
त्यानंतर लांबे म्हणतात की, अर्शद तू आताच वक्फमध्ये काम सुरू कर.
आपल्याकडे पावर आहे, कमवण्याची सेटींग कर, अर्धे पैसे तूझे आणि अर्धे माझे.

देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत सरकारला मोठा झटका दिला आहे.
अर्शद खान हा ठाण्याच्या (Thane) जेलमध्ये आहे. त्याचा मोबाईल पोलिसांकडे (Police) आहे तो ताब्यात घ्यावा.
असं सांगताना, चक्क दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर नियुक्त केलीत की काय ?, असा सवाल फडणवीसांनी सरकारला केला.

 

दरम्यान, अर्थसंकल्पामधील (Budget) चार गोष्टी इकडे तिकडे कमी जास्त झालेल्या चालतील मात्र दाऊदसोबत ज्यांचे संबंध आहेत.
अशा लोकांना महाराष्ट्र सरकार पाठिशी घालत असेल तर या राज्याचं कोणीच भलं करू शकणार नाही, सरकारने आतातरी जागं व्हावं, असं फडणवीस म्हणाले.
या नव्या बॉम्बमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | maharashtra budget session another pen drive submitted by bjp leader devendra fadnavis serious allegations on minister nawab malik

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा