Devendra Fadnavis On HM Amit Shah Mumbai Visit | HM शाहांच्या दौर्‍याबाबत फडणवीसांची महत्वाची माहिती; राज ठाकरेंना भेटणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On HM Amit Shah Mumbai Visit | मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Elections 2022) मनसे (MNS) हा भाजपाचा (BJP) प्रमुख मोहरा असणार आहे. त्यादृष्टीने भाजपाने पावले टाकण्यास सुरूवात देखील केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी ठाकरेंच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. आता केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई (HM Amit Shah Mumbai Visit) दौर्‍यावर येणार असून ते मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना भेटण्याची शक्यता आहे. मात्र, शहा यांच्या या दौर्‍याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On HM Amit Shah Mumbai Visit) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गणेशोत्सव काळात दरवर्षी अमित शाह मुंबईत येतात. लालबागचा राजा, आशिष शेलारांच्या गणपती दर्शन, मुख्यमंत्री आणि माझ्याकडेही गणेश दर्शनासाठी येतील. काही घरगुती गणपतीचे शाह दर्शन घेणार आहेत. त्याशिवाय एका शाळेचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. भाजपा पदाधिकार्‍यांसोबत अमित शाह यांची एक बैठक होईल. तसेच कुठलाही कार्यक्रम अमित शाह यांच्या दौर्‍यात नाही असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात भेट होणार असल्याचे नाकारले आहे.

फडणवीस यांनी सांगितले की, शाह यांच्या दौर्‍यात मुंबईतील पक्षाचे पदाधिकारी आणि भाजपा कोअर कमिटीची बैठक होणार आहे.
त्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुंबई ही अमित शाह यांची जन्मभूमी असल्याने विशेष प्रेम या शहरावर आहे.
दरवर्षी ते गणेशोत्सवात गणपती दर्शनासाठी येतात. एल अँन्ड टीकडून एका शाळेचे उद्धाटन करण्यात येणार आहे.

 

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर मोदी सरकार (Modi Government) करत असल्याच्या टिकेवर फडणवीस म्हणाले,
सध्या केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप करण्याची फॅशन आहे. कार्याला कार्याने उत्तर देऊ शकत नाही तेव्हा असे होते.
मोदींची प्रतिमा इतकी मोठी झाली आहे. ज्याप्रकारे त्यांनी कामे केली आहेत.
त्याला विरोधक उत्तर देऊ शकत नाहीत. मोदींनी विकासाचा एक रेष ओढली आहे त्यापेक्षा मोठी लाईन काढण्याचे काम विरोधकांनी करावे.

 

Web Title :- Devendra Fadnavis On HM Amit Shah Mumbai Visit | bjp leader devendra fadnavis imp information on home minister of india amit shahs visit will you meet raj thackeray mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Headache | तणाव आणि पाण्याच्या कमतरतेमुळे सुद्धा होऊ शकते डोकेदुखी, जाणून घ्या कोणती लक्षणे आहेत धोकादायक

 

Gold Price Weekly | ‘या’ आठवड्यात अचानक स्वस्त झाले सोने, परदेशी बाजारात सुद्धा घसरला भाव

 

BJP Ashish Shelar | ‘आता तुमच्या पक्षाला पेंग्विन सेना म्हणायचं का?’ – आशिष शेलार