Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, मराठा आरक्षणाबाबत आम्ही..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यातील (Jalna Maratha Protest) अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी आज १७ व्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपले अमरण उपोषण स्थगित केले. यानंतर मराठा आरक्षण आंदोलनात झालेल्या अमानुष लाठीमारानंतर टीकेचे लक्ष्य ठरलेले उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या उपोषणासंदर्भात पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil)

या संदर्भात ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहका‍र्‍यांच्या उपस्थितीत आज मागे घेतले, ही समाधानाची बाब आहे. (Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil)

मराठा आरक्षणाबाबत आम्ही प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नरत राहिलो. ते आम्ही दिले आणि हायकोर्टात टिकले सुद्धा. सुप्रीम कोर्टात ते का टिकले नाही, यावर मत व्यक्त करण्याची आज वेळ नाही.

मात्र, सारथी, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना,
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन, अधिसंख्य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या.

आजही या सर्व बाबतीत अतिशय गतीने काम सुरु आहे. भविष्यात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे
यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लोहगाव: अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; छेडछाड करणार्‍याला अटक

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावर 20 लाखांची फसवणूक

भीक मागण्यासाठी चक्क आपल्याच मुलीला विकले; देववाले समाजातील पंचासह १५ जणांवर गुन्हा दाखल

Shivsena MLA Disqualification Case | शिवसेना आमदार अपात्र प्रकरण!
एका आठवड्यात म्हणणं सादर करण्याचे दोन्ही गटांना विधानसभा अध्यक्षांकडून आदेश