Devendra Fadnavis On Pankaja Munde | ”तुम्ही दोघे असेच एकत्र राहिलात तर…”, देवेंद्र फडणवीसांची पंकजा आणि धनंजय मुंडेंना विनंती

बीड : Devendra Fadnavis On Pankaja Munde | पंकजा मुंडे म्हणाल्या की आज या स्टेजवर पंकजा मुंडे आहेत आणि धनंजय मुंडेही (Dhananjay Munde) आहेत. मी दोघांना एकच विनंती करेन तुम्ही दोघे असेच एका स्टेजवर राहा. यांना आज सांगू इच्छितो की तुम्ही दोघंही एकत्र राहा. आमच्या तिघांची ताकद तुमच्या पाठिशी अशी उभी करु की परळी किंवा बीड असेल काहीही पाहायची आवश्यकता नाही. तुम्ही एकत्र राहिलात तर परळी आणि बीडचे कल्याण होईल तसेच महाराष्ट्राचेही कल्याण होईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी, बीड येथे केले. (Devendra Fadnavis On Pankaja Munde)

आज परळी येथे सरकार आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आल्याने तो चर्चेचा विषय झाला होता. तसेच कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. (Devendra Fadnavis On Pankaja Munde)

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज परळीत आल्यावर दोन महत्त्वाच्या नाथांचे दर्शन आम्ही घेतले.
परळी वैजनाथाचे आणि ज्यांच्या उर्जेमुळे राजकारणात आहोत त्या गोपीनाथाचे दर्शन आम्ही घेतले.
परळी वैजनाथाच्या चरणी नतमस्तक होताना मी गोपीनाथ मुंडे यांनाही अभिवादन करतो. खरं म्हणजे धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी एक मिरवणूक ठेवली होती. ती मिरवणूक काढली असती तर संध्याकाळपर्यंत कार्यक्रम झाला नसता. कारण तुमचे दर्शन आम्हाला झाले नसते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज मराठवाडा संकटात आहे. बीड जिल्हा संकटात आहे. मोठ्या प्रमाणात दुष्काळाची छाया आहे.
एका गोष्टीचं समाधान आहे की आपण निर्णय केला आणि एक रूपयात पिक वीमा योजना जाहीर केली.
हा वीमा सर्वांना मिळाला पाहिजे यासाठी धनंजय मुंडेंनी प्रयत्न केले. शेतकऱ्यांना एकनाथ शिंदे सरकार पूर्णपणे मदत करेल.
त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही तिघे एकत्र आलो आहोत. आमच्या मनात एकच ध्यास आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा विकास.
काही लोकांना ते नको आहे. काहीजण रोज बेताल वक्तव्य करतात. आम्ही लक्षही देत नाही.
आम्ही ज्या राज्यांमध्ये प्रचाराला गेलो तिथे चांगला विजय मिळाला. त्याचीही पोटदुखी काहींना आहे.
ते म्हणतात शेजारच्या राज्यात का गेले? तुम्हाला शेजारच्या घरात कुणी बोलवत नाही आम्हाला राज्यात बोलवतात.
पुढच्या वेळी तर अजित पवारांनाही घेऊन जाणार आहोत. तरीही आमचे लक्ष महाराष्ट्राकडेच आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करणारे सायबर पोलिसांच्या ताब्यात

Congress Nana Patole | शिंदे-फडणवीस-पवार सरकारने गुन्हेगारीत महाराष्ट्राला युपीच्या पंगतीत बसवले : काँग्रेस