Devendra Fadnavis On Pune Police | पुणे पोलिसांच्या यशामुळे देशभरातील कारवायांना बळ, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे पोलिसांचे तोंड भरून कौतुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Pune Police | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्लीत छापा टाकून तब्बल 3 हजार 500 कोटी रुपये किंमतीचे 1700 किलो ड्रग्स जप्त केले आहे. तर या प्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या यशामुळे देशभरातील कारवायांना बळ मिळणार आहे. तसेच पुणे पोलिसांच्या माहितीनुसार इतर राज्यात देखील कारवाई केली जात असल्याचे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) आणि पुणे पोलिसांचे कौतुक केले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी जी कारवाई केली आहे त्याबद्दल पुणे पोलिसांचे अभिनंदन केले पाहिजे. ज्या प्रकारे पोलिसांनी ड्रग्जचा हा साठा शोधून काढला आहे. आम्ही सातत्याने सांगत आहोत की सरकारकडून ‘झिरो ड्रग्ज पॉलिसी, नो टोलरन्स फॉर ड्रग्ज’ असे धोरण आखले आहे. केवळ मुद्देमाल पकडून थांबू नका, तर त्याही पुढे जाऊन त्याच्यापाठी असलेल्यांना शोधून काढण्याचे आदेश गृहखात्याने दिले होते. सर्व युनिट्सला सांगण्यात आले आहे की, केवळ मुद्देमाल जिथे मिळतो तिथपर्यंत सीमीत राहु नका. त्याचे बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज देखील शोधून काढा, आणि नेमकं ते काम पुणे पोलिसांनी केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज दोन्ही कडे मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा मिळाला असून षडयंत्राचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे अनेक ठिकाणी आहेत. जे पुणे पोलिसांमुळे सापडले आहेत. पुणे पोलीस आता केंद्राच्या नार्कोटिक्स विभागाबरोबर काम करून आणखी खोलात जाऊन तपास करणार आहेत. अनेक राज्यात अमली पदार्थाविरोधी कारवाई करणे आवश्यक आहे. पुणे पोलिसांकडे असलेल्या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या राज्यांमध्ये कारवाई सुरु झाली आहे. पुणे पोलिसांच्या यशामुळे देशभरातील कारवायांना बळ मिळणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

सहाव्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू, मुंढवा परिसरातील घटना; कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल