Pune Mundhwa Crime | सहाव्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू, मुंढवा परिसरातील घटना; कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Mundhwa Crime | नियोजित इमारतीचे बांधकाम करत असताना सहाव्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू झाला. हा प्रकार मुंढवा येथील स्काय वन बिल्डींग या बांधकाम साईटवर घडला आहे. याप्रकरणी बांधकाम साईटवरील कॉन्ट्रॅक्टर आणि जागा मालक डेव्हलपर्स व इतरांवर मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवार (दि.22) रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

रणधीर कुमार मेहता असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टर मोहन वसंत मालवडकर जागा मालक डेव्हलपर्स व इतरांवर आयपीसी 304(अ), 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार अक्षय मोहन धुमाळ यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. (Pune Mundhwa Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा परिसरातील भिमनगर येथील स्काय वन बिल्डिंग बांधकाम साईट सुरु आहे.
मयत रणधीर मेहता हे या बांधकाम साईटवर मजूरी करता.
ते गुरुवारी (दि.22) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सहाव्या मजल्यावर काम करत होते.
तेव्हा तोल जाऊन ते तळमजल्यावरील लिफ्टच्या बाजूला असलेल्या डक्ट मध्ये पडले.
यामध्ये गंभीर जखमी होऊन रणधीर मेहता यांचा मृत्यू झाला. बांधकाम मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही
साधनसामग्री न पुरविल्याने ही दुर्घटना घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन जेष्ठ नागरिकाची आत्महत्या, आंबेगाव येथील प्रकार

Executive Engineer Kiran Deshmukh Suspended | पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख निलंबित, जाणून घ्या कारण

Pune Navale Bridge Accident | पुणे: नवले पुलाखाली विचित्र अपघात; 8 ते 9 वाहने एकामेकांना धडकली (Video)

PM Narendra Modi In Yavatmal | पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता

Sanjay Raut On BJP | राऊतांचा मोठा दावा, दोन्ही गटांना नड्डांनी सांगितले की, ”धनुष्यबाण, घड्याळाला लोक मतदान करणार नाहीत, त्यामुळे…”

Pune NCP News | प्रशांत जगताप यांच्यासह शरद पवार गटाच्या 9 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण (Videos)

बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर येथील प्रकार