Devendra Fadnavis On Shraddha Walker Murder Case | ‘… तर श्रद्धाचा जीव वाचला असता’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Shraddha Walker Murder Case | दिल्लीत झालेल्या श्रद्धाच्या हत्येमुळे देश आणि राज्य हादरले आहे. श्रद्धाचा मारेकरी म्हणजे तिचा प्रियकर आफताब पूनावाला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने रागाच्या भरात आपण श्रद्धाचा खून केल्याचे कबूल केले आहे. या प्रकरणाचा अधिक उलगडा होण्यासाठी आफताबची नार्को चाचणी करण्यात येणार आहे. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रद्धाने पोलिसांना दिलेले पत्र मी वाचले आहे. ते पत्र अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी याची वेळीच दखल घेतली असती, तर श्रद्धाचा जीव वाचला असता, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. (Devendra Fadnavis On Shraddha Walker Murder Case)

 

श्रद्धाने 23 नोव्हेंबर 2020 रोजी नालासोपाऱ्याच्या तुळींज पोलीस ठाण्यात आफताबची तक्रार दिली होती. यात तिने आफताब तिला ठार मारण्याची धमकी देत असून, तो तिला रोज मारहाण करतो असं लिहीलं होतं. तसेच तिला आफताबशी आता कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत, असे देखील तिने पत्रात नमूद केले होते. तरी देखील पोलिसांनी आफताबवर काही कारवाई का केली नाही, यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. श्रद्धाला आफताबने आत्महत्या करण्याची धमकी दिल्यावर तिने पोलिसांतून तक्रार मागे घेतली होती. पण यामुळे श्रद्धाला जीव गमवावा लागला.

त्यावर फडणवीस म्हणाले, ते पत्र माझ्याकडेही आले आहे. ते फार गंभीर पत्र आहे.
त्याच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, याचा तपास करणार आहोत. मी कुणावरही आरोप करणार नाही.
पण या प्रकारच्या पत्रांवर कारवाई नाही झाली, तर अशा घटना घडतात. त्यामुळे या पत्राचा नक्कीच तपास केला जाईल.
जर त्या पत्रावर कारवाई झाली असती, तर कदाचित श्रद्धाचा जीव वाचला असता.

 

Web Title :- Devendra Fadnavis On Shraddha Walker Murder Cas | shraddha walker murder case letter to police devendra fadnavis reacts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule On Devendra Fadnavis | सुप्रिया सुळेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून विधान, म्हणाल्या – ‘हा यू टर्न आता चालणार नाही’

Pune Rural Police | अल्पवयीन मुलांना वाहन देणे पालकांना पडले महागात, पोलिसांकडून पालकांवर खटले दाखल

Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…