Devendra Fadnavis On Supriya Sule | ‘महाराष्ट्राच्या नकाशावर विदर्भ आहे हे लक्षात येतंय’, विदर्भ दौऱ्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला (व्हिडिओ)

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Supriya Sule | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या 1 ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर (Supriya Sule On Vidarbha Tour) आल्या आहेत. या दौऱ्यात त्या नागपूर (Nagpur), वर्धा (Wardha) व अमरावती (Amravati) जिल्ह्यांमध्ये फिरून स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या भेटी घेणार आहेत. सुप्रिया सुळे यांच्या विदर्भ दौऱ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दात टोला लगावला आहे. ते सेवाग्राम येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Devendra Fadnavis On Supriya Sule)

सर्व भावी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

जनता राज ठाकरेंकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहते, असा दावा मनसेच्या नेत्याने केला आहे. या विधानाबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी टोला लगावला. ज्या ज्या पक्षातल्या ज्या ज्या लोकांना त्यांचे जे जे नेते भावी मुख्यमंत्री वाटतात, त्या सगळ्या भावी मुख्यमंत्र्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. (Devendra Fadnavis On Supriya Sule)

ओबीसी योजनांबद्दल जनजागृती यात्रा

यावेळी देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी योजनांबद्दल जनजागृती यात्रा काढण्यासंदर्भात विचारणा केली.
यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, जनजागृतीची योजना आहे. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली यात्रा निघणार आहे. वेगवेगळ्या भागातून ही यात्रा जाणार आहे. तिथे ओबीसी योजनांच्या संदर्भात जनजागृती केली जाईल. ओबीसींसाठी इतक्या योजना महाराष्ट्र व केंद्र सरकारने तयार केल्या आहेत. ओबीसी समाजात परिवर्तन करणारी विश्वकर्मा ही मोठी योजना आहे. हे त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं यासाठी हा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सुप्रिया सुळेंना खोचक टोला

सुप्रिया सुळेंच्या विदर्भ दौऱ्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले असता त्यांनी आपल्या शुभेच्छा
असल्याचे म्हटले. मला एका गोष्टीचा आनंद आहे की इतक्या वर्षांनंतर का होईना, सुप्रिया सुळेंना विदर्भ आठवला.
विदर्भ महाराष्ट्राच्या नकाशावर आहे हे सुप्रिया सुळेंना लक्षात येतंय. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला माझ्या शुभेच्छा आहेत,
असा टोला त्यांनी लगावला.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1708741227980722431?s=20

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ISIS Case | पुणे पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या ISIS च्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कामगिरी; NIA ने जाहीर केले होते बक्षीस