Devendra Fadnavis | ठाकरे गटाचा मुंबई मनपावर विराट मोर्चा, फडणवीस म्हणाले ‘हा मोर्चा म्हणजे चोराच्या…’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Group) येत्या 1 जुलैला मुंबई महापालिकेवर (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना नेत्यांसह आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) करतील अशी घोषणा माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. ठाकरे गटाच्या मोर्चावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाचा मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असे म्हणत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

 

पावसाप्रमाणे निवडणुका लांबत चालल्या आहेत. सरकारला जाब विचारणारं कोणीच नाही. मुंबईत विकास कामाच्या नावानं उधळपट्टी सुरु आहे. शिंदे सरकार बीएमसीमधील ठेवींची उधळपट्टी करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. या मोर्चाच्या माध्यमांतून मुंबईतल्या भ्रष्टाचाराचा जाब विचारला जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

 

देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

उद्धव ठाकरे यांच्या या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबई महापालिकेत साडेबारा हजार कोटी रुपयांचा घोटळा झाला, तो कॅग (CAG) रिपोर्ट मुळे उघडकीस आलं. या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्यासाठी एसआयटी (SIT) स्थापन केली आहे. या एसआयटीमुळे काही लोकांचे बुरखे फाटणार आहेत, तर काही लोक नागडे होणार आहेत, अशी टीका फडणवीस यांनी आहे.

 

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मध्यंतरी दोन-अडीच वर्षांमध्ये महापालिकेत जी गँग उद्धवजींच्या आशिर्वादाने काम करत होती,
तिचे बुरखे फाटणार आहेत. हे उद्धवजींच्या लक्षात आल्यानंतर ते बावचळल्यासारखे बोलत आहेत.
हा मोर्चा काढणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, याशिवाय जास्त काही म्हणता येणार नाही, असा निशाणाही फडणवीस यांनी साधला आहे.

 

 

Web Title :  Devendra Fadnavis | shivsena uddhav thackeray morcha on bmc devendra fadnavis reacts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | Gang spreads terror in Taljai area of Sahakar Nagar police station;
Vandalise 26 vehicles; Police apprehend notorious criminal Papulya Waghmare

Pune PMC Property Tax | Property owners to get 5-10% rebate on general tax; PMC announces lottery scheme