HomeशहरअहमदनगरDevendra Fadnavis | 'मुख्यमंत्री जे बोलले ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही' -...

Devendra Fadnavis | ‘मुख्यमंत्री जे बोलले ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही’ – देवेंद्र फडणवीस

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shivsena) आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या नेहमीच झडत असतात. मात्र काही दिवसापासून दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विधिमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब (Pen Drive Bomb) टाकला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भावनिक भाष्य करत फडणवीसांच्या आरोपांना चोख उत्तर दिले. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या या भावनिक भाषणावर (Emotional Speech) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली आहे.

 

शिर्डी (Shirdi) दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, सध्या जी भ्रष्टाचाराची (Corruption) प्रकरणे बाहेर येत आहेत.
त्यामुळे भ्रष्टाचारातील सत्य नाकारता येत नाही. तसेच त्यावर उत्तर देता येत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक भाषणाचा आधार घेतला.
ते जे बोलले ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
आगामी विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections) आम्ही तयारी करत आहोत.
कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर आम्ही सरकार स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, पुराव्यानिशी भ्रष्टाचाराची प्रकरणे मांडली. कोरोना (Corona) काळात मुंबई महापालिकेत (Brihanmumbai Municipal Corporation) कशी लूट झाली याची उदाहरणे दिली.
त्यावर सत्ताधारी पक्षाकडे किंबहुना मुख्यमंत्र्यांकडे उत्तरे नव्हती. त्यामुळेच त्यांनी भावनिक भाषणाचा आधार घेतला.

फडणवीस यांना यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे स्वत: हातोडा घेऊन निघाल्याप्रकरणी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ते केवळ प्रातिनिधिक स्वरूपात हातोडा घेऊन निघाले.
कारवाई ही संबंधित संस्था किंवा न्यायालयच करणार आहे.
आमची भूमिका संघर्षाची नसल्याचे स्पष्ट करत कुठल्याही कारवाईने आम्ही दबणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
कोणतीही एजन्सी कोण कोणाचा नातेवाईक आहे हे पाहून कारवाई करत नाही.
तथ्यांच्या आधारावरच कारवाई होत असते, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
दरम्यान, यावेळी शिर्डी संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (Shirdi Saibaba Sansthan CEO Bhagyashree Banayat)
व विश्वस्त जयंत जाधव (Jayant Jadhav) यांनी फडणवीस यांचा सत्कार केला.

 

Web Title :- Devendra Fadnavis | the chief minister does not need to be taken seriously bjp leader devendra fadnavis said lightly

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News