DG हेमंत नगराळे मंगळवारी पुणे दौऱ्यावर; पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहिती घेणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पोलीस महासंचालक हेमंत नगराळे हे मंगळवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांची पोलीस महासंचालक म्हणून पहिलीच भेट असणार आहे.

पोलीस महासंचालक हेमंत नगराळे सकाळी पुण्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर ते पुणे पोलीस आयुक्त तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त तसेच विभागाचे आयजी व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बैठक असणार आहे. त्यात गुन्हेगारी तसेच पोलिसांच्या अडचणी यासंबंधी चर्चा असणार आहे. दरम्यान पुण्यात ते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात देखील माहिती घेण्याची शक्यता आहे. ते मंगळवारी दिवसभर पुण्यात असून, सायंकाळी मुंबईकडे जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.